ठाण्यात शिंदेंची पहिली यादी जाहीर , ठाकरेंना टक्कर देण्यासाठी उतरवले तगडे मावळे रिंगणात; संपूर्ण यादी समोर

Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी शिंदे यांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर केली आहे.

News18
News18
ठाणे :  राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. आज निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म (AB Form) वाटण्यासाठी लगबग सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी शिंदे यांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर केली आहे.
ठाण्यात भाजपा शिवसेनेची युती होईल असं सांगितलं जात होतं पण जागावाटपावरुन सतत फिस्कटत असलेल्या बैठकांमुळे ठाण्यात युती होणार का नाही याची चर्चा रंगली होती गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या महायुतीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रदीर्घ बैठकीनंतर अनेक दिग्गजांचे तिकिट कापून भाजपा आणि शिवसेनेने अखेर ठाणे मनपात युती केली आहे. शिवसेना 87 , भाजपा 40 जागा आणि इतर जागा घटकपक्षांना असं जागावाटप झाले असून सर्व 131 जागांवर भाजपा शिवसेना युतीने अर्ज भरले आहेत.महापालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी कोणतीही अधिकृत यादी लवकर जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली आहे.
advertisement

उमेदवारांची यादी जाहीर

प्रभाग क्रमांकउमेदवाराचे नावइतर माहिती
3विक्रांत वायचळउमेदवारी जाहीर
3मीनाक्षी शिंदे
6-7उषा डोंगरे
6-7कांचन चिंदरकर
6-7दिलीप बारटक्के
13अशोक वैती
15एकनाथ भोईर
18राम रेपाळे
18जयश्री फाटक
18मीनल संखे
19प्रकाश शिंदे
19संध्या मोरे
19योगेश जानकर
19गुरुमुख सिंहबायकोला तिकीट
19शैलेश शिंदे
19मनोज शिंदे
-देवराम भोईरप्रभाग स्पष्ट नाही
-उषा भोईर
-संजय भोईर
-भूषण भोईर
-नम्रता भोसले
-विकास रेपाळे
-निर्मला कणसे
-
एकता एकनाथ भोईर
-अनिल भोर
-वर्षा
-मनोज शिंदे
-लव पाटील
-पद्मा भगत
-सुधीर कोकाटे
-पल्लवी कदम
खारटण रोडउषा वाघ
सुनील हांडोरे यांच्या जागी
advertisement

ठाण्यात बंडोबांना थंड करण्यात युतीला यश

तर रात्री भाजपाच्या वर्तकनगर कार्यालयात तर सकाळी शिवसेनेच्या कार्यालयात तिकिट कापली गेल्याने अनेक नाराजांनी नाराजी व्यक्त केली होती काहींनी तर थेट बंडांचा इशारा दिला होता या बंडोबांना थंड करण्यात युतीला यश आलयं असा दावा भाजपाचे ठाणे निवडणूक प्रभारी तथा आमदार निरंजन डावखरे आपल्या सोबत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
ठाण्यात शिंदेंची पहिली यादी जाहीर , ठाकरेंना टक्कर देण्यासाठी उतरवले तगडे मावळे रिंगणात; संपूर्ण यादी समोर
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement