Shani Rekha Position: तळहातावर शनि पर्वताचं स्थान कुठं असतं? या रेषा स्पष्ट असल्यास इतके फायदे

Last Updated:

Shani Rekha Marathi: हस्तरेषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान हातावरील रेषा आणि खुणांवरून ओळखता येते. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये काही महत्त्वाच्या रेषा ठळक असतात..

Shani Rekha Position: तळहातावर शनि पर्वताचं स्थान कुठं असतं? या रेषा स्पष्ट असल्यास इतके फायदे
Shani Rekha Position: तळहातावर शनि पर्वताचं स्थान कुठं असतं? या रेषा स्पष्ट असल्यास इतके फायदे
मुंबई : शनिदेवाची कृपा राहावी, यासाठी अनेकजण काळजी घेतात. शनी आयुष्यात स्थिरता आणू शकतो, असे मानले जाते. शनी कृपा राहावी यासाठी सगळे प्रयत्न करतात. हस्तरेषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान हातावरील रेषा आणि खुणांवरून ओळखता येते. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये काही महत्त्वाच्या रेषा ठळक असतात, ज्यामुळे त्याला कमी वयात चांगली संपत्ती मिळू शकते.
आज आपण शनी रेषेबद्दल जाणून घेणार आहोत, तळहातावर शनि रेषा खूप मजबूत असेल तर व्यक्ती खूप कमी मेहनत करूनही मोठे यश मिळवू शकते. जाणून घेऊया तळहातावर शनीची रेषा कोठे असते आणि तिच्यामुळे माणसाला कोणते फायदे होतात?
तळहातावर शनी रेषा - शनी रेखा मणिबंध किंवा हाताच्या मधल्या भागापासून सुरू होऊन शनी पर्वतापर्यंत जाते. तळहाताच्या मधल्या बोटाच्या खाली असलेल्या स्थानाला शनी पर्वत म्हणतात. हातामध्ये खोल, स्पष्ट आणि अखंड शनि रेषा असणे खूप शुभ असते.
advertisement
शनी रेषा स्पष्ट असल्यास - हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर शनी रेषा स्पष्ट असेल तर एखाद्या व्यक्तीला अधिकारी पदाची चांगली नोकरी मिळते. अशा व्यक्तीने थोडे प्रयत्न केल्यास सरकारी नोकरीतही यश मिळते. याशिवाय अशा व्यक्तीला समाजात खूप मान-सन्मान मिळतो.
समाजात वेगळी ओळख - हस्तरेषा शास्त्रानुसार बृहस्पति पर्वतावरून येणारी रेषा शनी पर्वतापर्यंत पोहोचली तर अशा व्यक्तीचे मन शुद्ध असते. तसेच, ते पैसे कमावण्यातही पुढे असतात. या लोकांना लक्झरी लाईफ जगायला आवडते. समाजात ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. हे लोक काहीसे हट्टी स्वभावाचे असतात. ते कोणतेही करिअर करत असले तरी त्यात यश मिळवतात.
advertisement
मोठे उद्योगपती होतात - एखाद्या व्यक्तीच्या हातातील रेषा आयुष्य रेषेपासून लांब होऊन शनी पर्वतापर्यंत पोहोचली असेल तर ही स्थिती अत्यंत शुभ असते. अशी रेषा असलेली व्यक्ती आपल्या मेहनतीने प्रत्येक कामात यश मिळवते. पण अशी रेषा तुटलेली असू नये. हे लोक स्वादिष्ट पदार्थ खाण्याचे शौकीन असतात. याशिवाय हे लोक व्यवसाय करण्यातही निष्णात असतात आणि व्यवसायात जोखीम घेण्यास ते घाबरत नाहीत. हे लोक 35 वर्षांच्या वयानंतर खूप पैसे कमावतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Rekha Position: तळहातावर शनि पर्वताचं स्थान कुठं असतं? या रेषा स्पष्ट असल्यास इतके फायदे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement