रक्षाबंधनाला भावालाच नाही, तर पतीलाही बांधत असत रक्षासूत्र, पंचागकर्त्यांनी सांगितली ‘ती’ परंपरा
- Published by:News18 Digital
Last Updated:
पूर्वीच्या आणि सध्याच्या रक्षाबंधनात काय फरक आहे? याबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिलीय.
पुणे, 28 ऑगस्ट : बहिण-भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. राखी बांधल्यानंतर भाऊ त्याच्या बहिणीला भेटवस्तू देतो तसंच आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. शुभ मुहूर्त किंवा भाद्र-मुक्त काळात भावाच्या मनगटावर राखी बांधल्याने भावाला यश आणि विजय प्राप्त होतो. यापूर्वी रक्षाबंधन कसे होत असे? पूर्वीच्या आणि सध्याच्या रक्षाबंधनात काय फरक आहे? याबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिली.
बुधवारी 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन आहे. सकाळी 11 वाजता पौर्णिमा सुरू होत असून त्या दिवशी नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत भद्रा आहे. अनेकांना प्रश्न असा आहे की या काळामध्ये म्हणजे रात्री नऊ पर्यंत रक्षाबंधन करावे की नाही? तर पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने रक्षाबंधन होत असत त्यातील एक पद्धत म्हणजे ब्राह्मण विशिष्ट होम करून ते रक्षा स्तोत्र राजाला बांधत. राजाच्या रक्षणासाठी हे बंधन बांधले जात.
advertisement
त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे नातेसंबंधांचे रक्षाबंधन. यामध्ये आत्ता सारख्या राखी नव्हत्या. रेशमी धागा घेऊन एका कपड्यात, त्याच्यामध्ये दूर्वा, अक्षता, केशर, चंदन सोनं मोहरीचे दाणे अशा इत्यादी गोष्टी घालून रेश्मी कपड्यात त्याची फुरचूंडी केली जायची. ते दोऱ्याने बांधून ती रक्षा देवघरांमध्ये कलशावर ठेवून त्याची पूजा केली जायची. त्यानंतर ते रक्षासूत्र पत्नी - पतीला, मुलगी-वडिलांना किंवा भाऊ -बहिणाला बांधत. सध्याच्या काळात या प्रकारच्या विद्येवर पूजा केली जात नाही, अशी माहिती दाते यांनी दिली आहे.
advertisement
"वर्तमान काळामध्ये आत्ता ज्या पद्धतीने रक्षाबंधन उत्सव साजरा होतो त्याला सामाजिक आणि कौटुंबिक स्वरूप आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बांधल्या जातात. कृत्रिम राख्या, स्पंज, थर्माकोल किंवा फॅन्सी स्वरुपाच्या राख्यांचा यामध्ये समावेश आहे, असं दाते यांनी स्पष्ट केलं.
advertisement
आजकाल आपण रक्षा बंधन साजरा करतो ज्यात आपण मित्रांना किंवा मैत्रिणीला त्याच बरोबर, बहिणी एकमेकींना राखी बांधतात. त्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे स्वरुप असं रक्षाबंधनाचे स्वरुप झालंय, अशी माहिती त्यांनी दिली.
(सूचना: या बातमीत दिलेली सर्व माहिती आणि तथ्ये गृहितकांवर आधारित आहेत. न्यूज18 मराठी या कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही.)
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 28, 2023 1:13 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
रक्षाबंधनाला भावालाच नाही, तर पतीलाही बांधत असत रक्षासूत्र, पंचागकर्त्यांनी सांगितली ‘ती’ परंपरा

