Shani Shingnagpur: शनिदेवाच्या पुजाऱ्यांना आता दक्षिणा नाही, कारण काय? पाहा संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Shani Shingnapur: अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरचा शनिदेव हे प्रसिद्ध देवस्थान आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात.
अहिल्यानगर: धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी, यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या पूजाऱ्यांना दक्षिणा मिळणार नाही. तर शनिदेवाच्या अभिषेकासाठी मानधन तत्त्वावर 6 पुरोहितांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी भाविकांना देवस्थानकडे 100 रुपये शुल्क भरून अभिषेक करता येईल. शनिवारी, 6 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून याबाबत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी माहिती दिली आहे.
दोन शिफ्टमध्ये पुजारी
शनिमंदिरात 6 पुजारी 2 शिफ्टमध्ये अभिषेक करतील. पहाटे 4 ते रात्री 10.30 अशा दोन शिफ्टमध्ये हे पुजारी काम करतील. सर्व अधिकृत पुरोहित पुजाऱ्यांना कामाच्या वेळी मोबाइल वापरता येणार नाही, असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
भाविकांसाठी दानपेटी
ज्या भाविकांना देवस्थानला दान द्यायचे आहे, त्यांच्यासाठी उदासी महाराज मठ आणि यज्ञमंडप येथे दानपेटी ठेवली जाणार आहे. शनिमंदिरात 1000 रुपयांहून अधिक रकमेपुढील मोठे देणगीदार व पंचक्रोशीतील भाविक यांच्याकडून अभिषेक देणगी स्वीकारली जाणार नाही, असेही विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरचा शनिदेव हे प्रसिद्ध देवस्थान आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Shingnagpur: शनिदेवाच्या पुजाऱ्यांना आता दक्षिणा नाही, कारण काय? पाहा संपूर्ण माहिती