Shravan 2025: शिवलिंगवर पॅकेटमधील दूध अर्पण करावं का? काय सांगतं शास्त्र?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शास्त्रानुसार, श्रावण महिन्यात शिवलिंगावर पूजा करताना वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. पॅकेज्ड दूध अनेक रासायनिक...
Shravan 2025: पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे आणि पहिल्याच दिवसापासून शिवमंदिरांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी दिसत आहे. भगवान शंकरांच्या पूजेसाठी श्रावण महिना सर्वात उत्तम मानला जातो. श्रावणात तुम्ही शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धोत्रा अर्पण करून भोलेनाथांना प्रसन्न करू शकता. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, शिवलिंगावर अर्पण केलेले सर्व पदार्थ शुद्ध आणि सात्विक असावेत. अनेक लोक शहरांमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे फक्त पॅकेटचे दूध उपलब्ध असते. अशा परिस्थितीत ते शिवलिंगावर फक्त पॅकेटचे दूध अर्पण करतात. पण, शिवलिंगावर पॅकेटचे दूध अर्पण करावे का?
पॅकेटचे दूध शिवलिंगावर अर्पण करावे का?
शास्त्रानुसार, पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. ही शुद्धता केवळ शारीरिक नसून, ती सात्विक गुणांशीही संबंधित आहे. पॅकेटचे दूध अनेकदा रासायनिक प्रक्रिया, साठवणूक आणि प्रिझर्वेटिव्ह्जमधून जाते. अशा परिस्थितीत, ते पूर्णपणे सात्विक आणि नैसर्गिक मानले जाऊ शकत नाही. यामुळे ते दूध पूजेसाठी योग्य आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर ताजे, कच्चे आणि शुद्ध गाईचे दूध अर्पण करणे सर्वोत्तम मानले जाते. शिवलिंगावर पॅकेटचे दूध अर्पण करणे योग्य मानले जात नाही. जर तुमच्या घरात गाईचे दूध उपलब्ध असेल, तर त्याच दुधाने शिवलिंगावर अभिषेक करा.
advertisement
पॅकेटचे दूध अर्पण करताना काय काळजी घ्यावी?
जर काही कारणास्तव शुद्ध देशी गाईचे दूध उपलब्ध नसेल आणि फक्त पॅकेटचे दूध हाच पर्याय असेल, तर त्यातही काही सावधगिरी बाळगावी. सर्वात आधी दूध उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर भगवान शंकरांना अर्पण करा. दूध शिळे, आंबट किंवा कोणत्याही प्रकारे भेसळयुक्त नसावे याची काळजी घ्या. धार्मिक विधींमध्ये भावना महत्त्वाच्या असतात, पण विवेक आणि शास्त्रीय आचार देखील आवश्यक आहेत. शिवलिंगावर अर्पण केलेल्या पदार्थांची शुद्धता हे पूजेच्या फलप्राप्तीचे मूळ आहे. काळजी घेतल्यास पूजा फलदायी होईल आणि धार्मिक परंपरांचा आदरही राखला जाईल.
advertisement
हे ही वाचा : Aajache Rashibhavishya: खूप कष्ट केलं, आता आराम करा, अचानक धनलाभाचा योग, पाहा आजचं राशीभविष्य
हे ही वाचा : Shravan 2025: श्रावण महिन्यात जन्म झालेल्या लोकांमध्ये या गोष्टी खास; महादेवाची कृपा असल्यानं...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 10:18 AM IST