Gurupurnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त खुलते पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर, भाविकांची मोठी गर्दी, काय आहे परंपरा? Video

Last Updated:

Trishunda Ganapati Temple Pune: पुणे शहरातील ऐतिहासिक आणि शिल्पवैभवाने समृद्ध असलेल्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली.

+
News18

News18

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक आणि शिल्पवैभवाने समृद्ध असलेल्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली. दरवर्षीप्रमाणे यंदाही केवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकदाच खुलेकरण्यात येणारं मंदिराचं तळघर दर्शनासाठी उघडण्यात आलं. या तळघरात गणपतगिरी गोसावी यांची समाधी असून, भाविकांसाठी हे स्थळ श्रद्धेचं केंद्र बनलं आहे.
त्रिशुंड गणपती मंदिराची स्थापत्यशैली पुण्यातील इतर कोणत्याही मंदिरापेक्षा वेगळी आणि लक्षवेधी आहे. वेरूळच्या लेण्यांप्रमाणे कोरीव शिल्पांनी सजलेली ही वास्तू शिवमंदिराच्या रचनेवर आधारित आहे. महाराष्ट्रात दुर्मिळ असलेली तीन सोंडांची गणेशमूर्ती या मंदिरात आहे. मंदिराच्या स्थापनेमागे 26 ऑगस्ट 1754 रोजी इंदूरजवळील धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरीजी यांचे योगदान आहे.
advertisement
मंदिराच्या विश्वस्त विश्वास स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तळघरात एक जिवंत झरा आहे. त्यामुळे तळघरात नेहमीच अडीच ते तीन फूट पाण्याचा साठा असतो. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून ते भाविकांसाठी खुले केले जाते. या ठिकाणी गणपतगिरी गोसावी यांची समाधी असून, गणेश पूजेच्या वेळी त्या पवित्र पाण्याचा प्रभाव समाधीवर देखील जाणवतो.
advertisement
गोसावी समाजाच्या मोठ्या वस्तीमुळे हे मंदिर सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. मंदिराच्या स्थापनेत गणपतगिरी गोसावी आणि निमगिरी गोसावी यांचे योगदान असून, ही परंपरा आजही अखंड सुरु आहेगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Gurupurnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त खुलते पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर, भाविकांची मोठी गर्दी, काय आहे परंपरा? Video
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement