महाराष्ट्रात इथं जलकुंडात आहे शिवमंदिर, श्रावण महिन्यात लागतात शिवभक्तांच्या रांगा
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
भारतातील जलकुंडात असणारं एकमेव शिवमंदिर महाराष्ट्रात आहे. इथं श्रावण महिन्यात भाविकांची मांदियाळी असते.
बीड, 20 ऑगस्ट: श्रावण महिना हा चातुर्मासाचा महिना म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अध्यात्मिक महत्त्व आहे. या महिन्याला सर्वात पवित्र महिना म्हटले जाते. आता श्रावण महिना हा सुरू झाला असून देशभरामधील शिव मंदिरे शिवभक्तांनी गजबजलेली दिसून येत आहेत. देशातील जलकुंडात असणारं एकमेव मंदिर बीडमध्ये आहे. या कंकालेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी असते.
ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर
बीड शहरातून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर महाराष्ट्रतच नव्हे तर भारतामधील एकमेव जलकुंडात असणारे महादेवाचे मंदिर आहे. श्रावण मासात या मंदिराला जत्रेचेच रूप येते. संपूर्ण महाराष्ट्रातून कंकालेश्वराच्या दर्शनासाठी भक्त येत असतात. या मंदिराची कलाकुसर आणि मंदिरामध्ये असणारी महादेवाची पिंड पाहण्यासाठी भाविक आवर्जून येतात.
advertisement
श्रावण मासात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्रावण महिन्यात देशभरातील शिवमंदिरात गर्दी असते. कंकालेश्वर मंदिरात या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावण मासात कंकालेश्वर मंदिर सकाळी 5 वाजता भाविकांसाठी खुले होते. या ठिकाणी फुलांच्या माळांची सजावट करून महाआरती पार पडते. त्यानंतर भाताचा महाप्रसाद या ठिकाणी महादेवाला दाखवला जातो आणि दुपारच्या सुमारास महाआरतीचे आयोजन केले जाते. या महाआरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. या महाआरती दरम्यान महादेवाला पुरणाचा प्रसाद दाखवला जातो.
advertisement
श्रावण महिन्यात मंदिर परिसरात जत्रेचे रूप येते. या ठिकाणी आठ दिवस संगीत सप्ताहाचे आयोजन देखील केले जाते. त्यानंतर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कीर्तन भजन देखील होतात. त्यामुळे संपूर्ण मंदिराचा परिसर हा भक्तिमय होतो. श्रावण महिन्यात महापंगतीचे देखील आयोजन केले जाते.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
August 20, 2023 9:40 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रात इथं जलकुंडात आहे शिवमंदिर, श्रावण महिन्यात लागतात शिवभक्तांच्या रांगा