Dagdusheth Ganpati: ढोल-ताशांचा गजर अन् मंत्रोच्चाराचे सूर, दगडूशेठ गणपती थाटात विराजमान, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Dagdusheth Ganpati: गेल्या 125 वर्षांपासून पुण्याचे श्रद्धास्थान ठरलेला दगडूशेठ गणपती हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे.
पुणे: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात झाली. सकाळपासूनच मंडळाच्या परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठेची विधिवत पूजा करण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पूजनाचा सोहळा पार पडला. पौराणिक विधीनुसार केलेल्या या पूजेमुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. भक्तांच्या जयघोषाने दगडूशेठ गणपतीच्या प्रांगणात ‘गणपती बाप्पा मोरया’चे गजर घुमत होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी शहरासह बाहेरील जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासून रांगांमध्ये उभ्या भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले आणि आपली मनोकामना व्यक्त केली. या वेळी मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर दिला असून, भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच, सुरक्षा व वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेने काटेकोर नियोजन केले आहे.
advertisement
गेल्या 125 वर्षांपासून पुण्याचे श्रद्धास्थान ठरलेला दगडूशेठ गणपती हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, अनाथ व ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे या मंडळाचे वेगळे स्थान आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, पुढील 10 दिवस दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढणार आहे.
advertisement
चित्रकुटेतील मठाधिपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
view commentsचित्रकुटातील श्रीदास हनुमान देवस्थानचे मठाधिपती रामानुजाचार्य झालरिया यांच्या हस्ते सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सभा मंडपात श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 27, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Dagdusheth Ganpati: ढोल-ताशांचा गजर अन् मंत्रोच्चाराचे सूर, दगडूशेठ गणपती थाटात विराजमान, Video

