देवीच्या अंघोळीच्या पाण्याने बरे होतात आजार; काय आहे शीतला देवी मंदिराची आख्यायिका?

Last Updated:

या मंदिरात देवीच्या अंघोळीच्या पाण्याने आजार बरे होतात असे सांगितले जाते.

+
News18

News18

कल्याण, 7 ऑक्टोबर : हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र. नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव समजला जातो. नवरात्री उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. देशात देवीची अनेक मंदिरे आहेत. यापैकीच शीतला देवीचे मंदीर कल्याणमध्ये आहे. या मंदिरात देवीच्या अंघोळीच्या पाण्याने आजार बरे होतात असे सांगितले जाते. त्यामुळे भाविक या ठिकाणी दूरवरून दर्शनासाठी येतात.
काय आहे आख्यायिका?
कल्याण स्थानक हे एक गजबजलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी शीतला देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात देवीची उपासना केली जाते. ही देवी स्वयंभू असून या मंदिरात कांजण्या, गोवर, खरूज यासारखे त्वचा रोग झाले असतील तर देवीचे अंघोळीचे पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकावे लागते त्यानंतर ते सर्व रोग बरे होतात अशी एक आख्यायिका आहे, अशी माहिती मंदिराच्या पूजारी काजल गुरव यांनी दिली.
advertisement
या देवीला दुपारी 12 वाजल्यानंतर घातली जाते अंघोळ
सर्वच देवळात देवांना सकाळी आंघोळ घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर पूजा अर्चा होते. मात्र या देवीला दुपारी 12 वाजल्यानंतर अंघोळ घातली जाते. तोपर्यंत भाविक येऊन देवीला पाणी अर्पण करतात. त्यानंतर दुपारी 12 नंतर देवीला अंघोळ घातली जाते. मुखवटे लावले जातात अशी माहिती मंदिराचे गुरव काळे यांनी दिली.
advertisement
कांजण्या आणि गोवर बरा होतो अशी ख्याती
गोवर, कांजण्या, खरूज झालेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या औषधाबरोबरच शीतलादेवीच्या मंत्रोपचाराने पाणी दिले जाते. हे पाणी अंघोळीच्या वेळी पाण्यात टाकले तर आराम पडतो अशी ख्याती आहे. त्यामुळे अनेक जण कांजण्या, गोवर झाला तर रुग्णांना या मंदिरात घेऊन येतात, पूजारी काजल गुरव यांनी सांगितले.
advertisement
शीळ सप्तमीला होतो कार्यक्रम
शीळ सप्तमीला या देवळात भाविक मोठी गर्दी करतात. या देवळात आदल्या दिवशी शिजवलेले अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करतात अशी प्रथा आहे.
नवरात्रात नवमीला होतो यज्ञ
नवरात्रात नऊ दिवस घट बसवले जातात. नऊ दिवस मंदिरात प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. नऊव्या दिवशी नाव चंडीचा होम केला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Temples/
देवीच्या अंघोळीच्या पाण्याने बरे होतात आजार; काय आहे शीतला देवी मंदिराची आख्यायिका?
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement