देवीने स्वप्नात येऊन दिला दृष्टांत, उत्खननातून मिळाली मूर्ती; काय आहे चतु:श्रृंगी मंदिराचा इतिहास? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यात अनेक देवी देवतांची मंदिर आहेत. त्यातीलच सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान चतु:श्रृंगी देवीच मंदिर आहे.
पुणे, 14 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रीला उद्या 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. पुण्यात अनेक देवी देवतांची मंदिर आहेत. त्यातीलच पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान असलेलं सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी देवीच मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1765 मध्ये करण्यात आलेली आहे. नवरात्र उत्सवात दर वर्षी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी इथे येत असतात. पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराचा इतिहास नेमका काय आहे? याबद्दलच चतु:श्रृंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ यांनी माहिती दिली आहे.
काय आहे इतिहास?
पेशवेकालीन म्हणजे 250 ते 300 वर्षांपूर्वी पेशव्याकडे एक दुर्लभशेठ पितांबर महाजन नावाचे सावकार होते. जे पेशवाच्या मोहिमांना कर्ज द्यायचे एवढे ते श्रीमंत होते. त्यांची स्वतःची टांगसाळ होती. म्हणजे नाणी पाडण्याचा कारखना होता. त्या टांकसाळीत त्यांनी देवीचा एक चांदीचा रुपया बनवला आणि त्याकाळी त्यांनी चतु:श्रृंगी रुपया नावाने प्रचलित केला होता. ते दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमा या दोन पूर्णिमाना सप्तश्रृंगी देवीची सेवा करण्यासाठी पुण्याहून नाशिकला वणीला 300 किमीचा प्रवास करून जायचे त्याची ही सेवा आव्हात पणे सुरु होती, असं नंदकुमार अनगळ सांगतात.
advertisement
मांसाहारी नैवेद्य न चालणारे काली मातेचे एकमेव रूप; देवीच्या नावाने ओळखला जातो ‘हा’ परिसर Video
पण कालांतराने जास्त वय झाल्यामुळे त्यांना वणी येथे जाणे अशक्य झाले आणि याचे त्यांना खूप दुःख होऊ लागले. त्याच वेळी देवीने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. मी पुणे शहराच्या वायव्य दिशेच्या डोंगरावर आहे. उत्खनन करून तुला माझी तांदळा स्वरूप मूर्ती मिळेल ती मीच आहे. त्याची तू पूजा कर त्यानंतर त्यांनी इथे उत्खनन केले मूर्ती सापडली तीच ही चतु:श्रृंगी देवी,असं नंदकुमार अनगळ सांगतात.
advertisement
कसं मिळालं नाव?
नाशिकच्या वणीला असणारी सप्तश्रृंगी देवी पाहिली तर ती सात डोंगराच्यामध्ये आहे. सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे डोंगराच शिखर म्हणून तिला सप्तश्रृंगी देवी म्हणतात. ही देवी स्वयंभू आहे. देवीचं स्वरूप पाहिलं तर डाव्या बाजूला मूर्ती झुकली आहे. आठरा हात आहेत आणि त्यातील एक तिच्या कानावर आहे. ही देवी देखील अशीच आहे. म्हणजे डाव्या बाजूला झुकलेली आहे. ही देवी चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच प्रकट झाली आहे. त्यामुळेच सप्तश्रृंगी देवीचं इथे प्रकट झाली आहे असं सांगितलं जातं. चतु:श्रृंगी हा संस्कृत शब्द असून; पूर्वी याठिकाणी चार डोंगर होते म्हणून या देवीला चतु:श्रृंगी असे नाव मिळाले, असंही नंदकुमार अनगळ सांगतात.
advertisement
परशुरामाला डोंगरावर झाले मातेचे दर्शन; पाहा काय आहे रेणुकादेवीची आख्यायिका Video
मंदिराची वास्तूशैली जी आहे ती मराठा वास्तू शैली आहे त्याप्रमाणे हे मंदिर बांधलं आहे. ही देवी जी प्रकट झाली ती 1765 मध्ये झाली. 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद असं मंदिर आहे. याला साधारण 258 वर्षा पेक्षा जास्त काळ झाला आहे. तेव्हा पासून ही मूर्ती आहे एका छोट्याशा गुहेमध्ये मूर्ती प्रकट झाली आहे. अनगळ घराण्याची ही 5 वी ते 7 वी पिढी आहे जी आम्ही देवीची सेवा करतो आहोत, अशी माहिती नंदकुमार अनगळ यांनी सांगितली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Oct 14, 2023 6:18 PM IST
मराठी बातम्या/Temples/
देवीने स्वप्नात येऊन दिला दृष्टांत, उत्खननातून मिळाली मूर्ती; काय आहे चतु:श्रृंगी मंदिराचा इतिहास? Video









