मांसाहारी नैवेद्य न चालणारे काली मातेचे एकमेव रूप; देवीच्या नावाने ओळखला जातो ‘हा’ परिसर Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या देवीच्या नावाने हा परिसर ओळखला जातो.
मुंबई, 14 ऑक्टोबर : नवरात्र उत्सव म्हणजे आदिमायेच्या शक्तीचा जागर आणि जगदंबा भवानीला प्रसन्न करण्याचे नऊ दिवस. देशभर विविध ठिकाणी देवीची मंदिरे असून या मंदिरांचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबईमधील असेच एक मंदिर म्हणजे श्री काळबा देवी मंदिर. या देवीच्या नावाने हा परिसर ओळखला जातो. नवरात्री उत्सवाच्या काळात काळबा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
कधी झाली प्रतिष्ठापना?
काळबामध्ये गजबजलेल्या परिसरात काळबा देवीचे मंदिर आहे. श्री काळबादेवी परिसरात असलेली ही काळबादेवी 225 वर्षांपूर्वीची असली तरी तिचे खरे स्थान सुरुवातीला माहीम आणि नंतर मुंबईतील आझाद मैदान म्हणजेच पूर्वीचे कापाचे मैदान येथे होते असा उल्लेख इतिहासात आहे. आझाद मैदानात काळबादेवीची तीनशे वर्षांपूर्वीच रघुनाथ कृष्ण जोशींनी प्रतिष्ठापना केली.
advertisement
जोशी घराण्याची सातवी पिढी सांभाळते मंदिर व्यवस्था
कृष्ण जोशी यांच्या निधनानंतर 225 वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या दबावामुळे या देवीचे पुन्हा काळबादेवी परिसरात स्थलांतर झाले. आज या देवीची आणि देवीच्या मंदिराची जोशी घराण्याची सातवी पिढी संपूर्ण व्यवस्था पाहत आहे. सध्या दिनेश जोशी हे सातव्या पिढीतील विश्वस्त आहेत. काळबादेवी ही स्वयंभू जागृत देवी असून तिच्यासोबत महालक्ष्मी आणि सरस्वती या देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
advertisement
नवरात्र उत्सवात नवमीला होते हवन
काळबादेवी ही काही समाजाची कुलदेवता असल्याने अनेक भाविक नवस करण्यासाठी आणि तो पूर्ण झाल्यावर फेडण्यासाठी देवीच्या मंदिरात येतात. नवरात्र उत्सवात नवस फेडण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नवरात्र उत्सवात परंपरेच्या प्रथेप्रमाणे येथे धार्मिक पूजा विधी होत असतात नवमीला मात्र येथे कोहळा कापला जातो. तसेच या दिवशी हवनाचे आयोजनही करण्यात येते.
advertisement
देवीला गोडा नैवेद्य
या देवीचे वैशिष्ट्य असे की इतर ठिकाणी कालीमातेला जसा मानसाहरी नैवेद्य चालतो. त्याप्रमाणे काळबा देवीला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. मांसाहारी नैवेद्य न चालणारे काली मातेचे हे एकमेव रूप असल्याचे मंदिर विश्वस्त दिनेश जोशी यांनी सांगितले.
मार्गशीर्ष अमावस्येला भरते जत्रा
डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्येला येथे मोठी जत्रा भरते, या देवीचे दर्शन गगनगिरी महाराज पिंगळाचे राहुल महाराज इंदूरचे नाना महाराज या सर्व महात्म्यांनी आणि धर्म पंडितांनी घेतले आहे.
advertisement
या मंदिरातून इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनाना झाली सुरुवात
इंग्रजांविरुद्ध उभ्या राहिलेल्या बंडात आणि आंदोलनात ज्या क्रांतीकारांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यापैकी काही क्रांतिकारक याच विभागात म्हणजे श्री काळबादेवीच्या मंदिर परिसरात राहत होते. त्यापैकी हुतात्मा बाबू गेनू, चाफेकर बंधूंचे अनेक सहकारी काळबादेवीचे दर्शन घेऊनच आपल्या क्रांतिकारक विचारांना सुरुवात करत असे सांगितले जाते.
advertisement
लवकरच होणार मंदिराचा जीर्णोद्धार
देवीचे मंदिर अगदीच अडचणीच्या ठिकाणी आणि भर गर्दीच्या बाजारपेठेत असल्याने भाविकांना देवीचे दर्शन सुलभत्याने घेता येत नाही ते सुलभतेने व्हावे यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून त्या मंदिराची जागा वाढविण्यात येणार असल्याचे माहिती दिनेश जोशी यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2023 3:13 PM IST
मराठी बातम्या/Temples/
मांसाहारी नैवेद्य न चालणारे काली मातेचे एकमेव रूप; देवीच्या नावाने ओळखला जातो ‘हा’ परिसर Video