‘इथं’ आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं उपपीठ; तुम्हाला इतिहास माहितीये का?

Last Updated:

हे मंदिर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे उपपीठ असल्याचं सांगितली जाते.

+
News18

News18

बीड, 13 ऑक्टोबर : नवरात्र उत्सव म्हणजे आदिमायेच्या शक्तीचा जागर आणि जगदंबा भवानीला प्रसन्न करण्याचे नऊ दिवस. काही दिवसांत नवरात्री उत्सवास सुरुवात होत आहे. देशभर विविध ठिकाणी देवीची मंदिरे असून या मंदिरांचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच प्रत्येक मंदिराबाबत एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. असंच एक मंदिर बीड शहरापासूनच जवळ असणाऱ्या शिदोड या गावी आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे उपपीठ असल्याचं सांगितली जाते. नवरात्री उत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
काय आहे या मंदिराचा इतिहास?
बीड शहरापासुन तीन किलोमीटर अंतरावरील शिदोड गावात महालक्ष्मीचे पुरातन मंदिर असल्याने गावाला देवीचे शिदोड असेही म्हणतात. 1748 मध्ये निरंतर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दा केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले आहे. 
advertisement
अशी सांगितली जाते आख्यायिका
बीडचे रहिवासी असणारे शिदोजी देशमुख हे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे मोठे भक्त होते. ते बीडचे निजामकालीन वतनदार होते. ते महिन्याला कोल्हापूरची वारी करत होते. प्रत्येक महिन्याला ते कोल्हापूरला दर्शनासाठी जात होते. ते जातांना बार्शी मार्गे सोलापूरला जात होते. आणि येत्याना पंढरपूर मार्गे तुळजापूर परत बीडला येत होते. परंतु काही काळानंतर वयामानानुसार त्यांना दर्शनासाठी जाणे होत नव्हते. मग त्यांनी देवीकडे जाऊन प्रार्थना केली माझे येणे होणार नाही तू माझ्या भेटीला येशील का? तेव्हा देवी प्रसन्न झाली.
advertisement
त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ते बीडकडे परतत होते. तेव्हा ते तुळजापूर मार्गे बीडकडे येत होते तेव्हा त्यांना देवीने सांगितले की मी तुझ्यासोबत येत आहे मात्र तू जर पाठीमागे वळून पाहिले त्याच जागी मी स्थायिक होईल. त्यानंतर शिदोची देशमुख हे शिदोड या गावी आल्यानंतर त्यांनी सहज पाठीमागे वळून पाहिले आणि शिळेच्या माध्यमातून देवी त्या ठिकाणी थांबली आणि तेव्हापासून हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरानंतर शिदोडची देवी हे उपपीठ असल्याची आख्यायिका सांगितली जाते, असं इतिहासकार प्रताप शेंडगे सांगतात.
advertisement
नवरात्र उत्सवात कार्यक्रमाचे आयोजन
नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज पहाटे पाच वाजता देविला महाभिषेक आणि महापूजा त्यानंतर काकड आरती केली जाते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारासमध्ये महापूजा रोज रात्री आरती नित्यनियमाने देवीची पूजा केली जाते, असं प्रताप शेंडगे सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Temples/
‘इथं’ आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं उपपीठ; तुम्हाला इतिहास माहितीये का?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement