पुण्यातल्या ‘या’ गुहेत होतं पांडवांचं वास्तव, एका रात्रीत कोरलं मंदिर!
- Published by:News18 Marathi
- Written by:News18 Marathi
Last Updated:
'पुणे शहरातल्या या लेण्यांमध्ये पांडवांचं वास्तव होतं. तसंच येथील मंदिरही त्यांनीच बांधलंय.'
पुणे, 9 सप्टेंबर : स्मार्ट सिटी अशी पुणे शहराची ओळख असली तरी शहराचं इतिहासाशी घट्ट नातं आहे. वेगवेगळी मंदिरं आणि वास्तूंमधून या खुणा दिसतात. पुणे शहर आणि परिसरातली काही मंदिरं आणि लेणी ही हजारो वर्ष जुनी आहेत. यापैकी एका मंदिर महाभारतकालीन असून पांडवांनीच ते एका रात्रीत बांधलं अशी श्रद्धा आहे.
पांडवांनी एका रात्रीमध्ये कोरले मंदिर
पुण्यातल्या बाणेर परिसरात हे मंदिर आहे. बाणेरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या थोडं पुढं जाऊन काही पायऱ्या चढल्यानंतर एका गुहेत हे मंदिर आहे. या मंदिराबाबत एक खास अख्यायिका असून मंदिराचे पुजारी गणेश भुजबळ यांनी याची माहिती दिली.
advertisement
पांडव अज्ञातवासामध्ये बाणेरमध्ये वास्तव्याला होते. त्यावेळी त्यांनी बाणेरच्या टेकडीमध्ये एका रात्रीत हे मंदिर कोरले, अशी अख्यायिका आहे. पांडवांनी मंदिरामध्ये तीन वेगवेगळ्या गुहा निर्माण केल्या. अर्जूनाने बाण मारून जलकुंडांमधून पाणी काढले. पांडवांनी रात्री मंदिर कोरून सकाळी कोंबड्याने बांग देताच ते निघून गेले. मंदिराचे मोठमोठे दगड भीमाने हाताने कोरले आहेत देखील आख्यायिका आहे, असंही भुजबळ यांनी सांगितलं.
advertisement
'अर्जूनाने सात जलकुंडांमध्ये बाण मारून पाणी काढले. हा पाण्याचा बारमाही स्रोत आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथे अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली असे सांगतात. मधल्या गुहेमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. हे शिवलिंग २००६ पर्यंत भग्नावस्थेत होते. पुढे त्या शिवलिंगाचा जीर्णोद्धार करून नवीन शिवलिंगाची प्राणप्रतिस्थापना करण्यात आली आणि या देवस्थानाला बाणेश्वर असे नाव देण्यात आले. असा इतिहास भुजबळ यांनी सांगितला.
advertisement
तुकाई मातेचं मंदिर
गुहेतल्या मंदिराच्यावर पाऱ्यांनी गेल्यानंतर एक दीपस्तंभ दिसतो. त्याच्या बाजूनं थोडं वर गेल्यानंतर तुकाई मातेचं मंदिर आहे. हजारो वर्षांपूर्वी अवाढव्य दगडांमध्ये हे मंदिर होते जे आता नव्याने तयार करण्यात आले आहे. बाणेश्वर गुहा मंदिराच्या खाली जोगेश्वरीची अखंड दगडाची मूर्ती पाहायला मिळते. बाणेर गावामध्ये हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर असा क्रम करत पुढे शिवाचे मंदिर(गुंफामंदिर) आणि तुकाई मातेचे मंदिर असे दर्शन करता येते.
advertisement
बाणेर नावाचा इतिहास
अर्जुनानं बाण मारुन येथील गुहेतून पाणी काढले असं सांगितलं जातं. पाण्याला कन्नड तसच अन्य काही भाषेत नीर असं म्हणतात. त्यावरुनच या गावाचं नाव 'बाणेर' पडलं अशी माहितीही पुजारी गणेश भुजबळ यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 09, 2023 12:46 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
पुण्यातल्या ‘या’ गुहेत होतं पांडवांचं वास्तव, एका रात्रीत कोरलं मंदिर!