महाराष्ट्रातील असं एक मंदिर, जिथे नवस फेडण्यासाठी नदीपात्रात सोडतात लाकडी पाळणा, काय आहे परंपरा?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावतीमधील चांदुर बाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी येथे गंगामाईचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन आहे असे तेथील नागरिक सांगतात. पौष महिन्यात या ठिकाणी विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर वर्षभरात केलेले नवस सुद्धा पूर्ण करतात.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरामध्ये प्रथा परंपरा पाहिला मिळतात. असंच एक मंदिर अमरावतीमधील चांदुर बाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी येथे गंगामाईचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन आहे असे येथील नागरिक सांगतात. पौष महिन्यात या ठिकाणी विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर वर्षभरात केलेले नवस सुद्धा पूर्ण करतात. ब्राम्हणवाडा थडी या गावातील नदीला अनेक वेळा पूर येऊन गेला. त्या पुरामध्ये मंदिरातील अनेक वस्तू वाहून गेल्या. मात्र गंगा माईची मूर्ती आणि पूजेचे साहित्य जाग्यावरून हलले सुद्धा नाही, असे नागरिक सांगतात.
advertisement
गंगामाई मंदिराविषयी लोकल 18 ने तेथील ग्रामस्थ दुर्गा चांडक यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, गंगा माई ही आमच्या गावची ग्रामदैवत आहे. ही मूर्ती याठिकाणी खूप पुरातन आहे. अनेक लोकं नवस सुद्धा करतात. येथील एक विशेष म्हणजे मंदिराच्या मागे असलेल्या पौषणी नदीला अनेक वेळा पूर येऊन गेला. येथील अनेक साहित्य वाहून गेले. मात्र, गंगा माईची मूर्ती आणि तेथील पूजेचे साहित्य जाग्यावरून हलले सुद्धा नाही, असे दुर्गा सांगतात.
advertisement
नवसाला पावणारी गंगामाई
त्याचबरोबर गंगामाई नवसाला पावणारी आहे. ज्यांना मुलंबाळं होत नाहीत असे लोकं येथे येऊन नवस करतात. त्यांचा नवस पूर्ण झाला की, पौषनी नदीच्या पात्रात लाकडी पाळणा सोडतात. हा नवस वर्षभरात कधीही पूर्ण केला जाऊ शकतो. मात्र, पौष महिन्यात याला जास्त मान्यता दिली आहे.
पौषनी काय आहे?
पौषनी म्हणजे दूध. या नदीच्या पात्रात कुठे तरी अदृश्य दुधाचा झरा नेहमी सुरू असतो, असे आमच्या पूर्वजांकडून सांगण्यात आले होते. दुधाचा झरा सतत वाहत असतो म्हणून या नदी पात्राला पौषनी असे म्हणतात. त्याचबरोबर गेले 40 वर्षांपासून याठिकाणी पौष महिन्यात मोठा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. हनुमान चालीसा पठण, शिवपुराण, यासारखे सप्ताह सुद्धा आमच्या गावकऱ्यांकडून आयोजित केला जातो. गंगा माईच्या कृपेने सर्वत्र भरभराटच होताना दिसत आहे, असे दुर्गा चव्हाण सांगतात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
January 25, 2025 7:16 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रातील असं एक मंदिर, जिथे नवस फेडण्यासाठी नदीपात्रात सोडतात लाकडी पाळणा, काय आहे परंपरा?