Kartiki Ekadashi 2025 : भक्तांनो! पंढरीच्या विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू, कार्तिकीवारीनिमित्त मंदिर समितीचा निर्णय
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात.
सोलापूर : कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात. भाविकांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन लवकरात लवकर आणि जलद व्हावे यासाठी 26 ऑक्टोबरपासून ते 9 नोव्हेंबर या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढल्याने काकड आरती, धूपारती, पोशाख, शेजारती, राजोपचार बंद राहणार असून या काळात केवळ नित्यपूजा, गंधाक्षता, महानैवेद्य हे राजोपचार सुरू राहणार आहे. दर्शन रांगेत मोठ्या संख्येने असलेल्या भाविकांना विठुरायाचे दर्शन लवकरात लवकर आणि सुलभ व्हावे यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे परंपरेनुसार 24 तास मुखदर्शन आणि 22:15 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध असणार आहे.
advertisement
कार्तिकी एकादशी यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलेले आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा आणि परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून श्रींचा पलंग काढणे, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, एकादशीच्या सर्व पूजा, महाद्वार काला आणि प्रक्षाळपूजा यांसारख्या मंदिराशी संबंधित सर्व प्रथा-परंपरांचे काटेकोरपणे पालन करण्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 27, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Kartiki Ekadashi 2025 : भक्तांनो! पंढरीच्या विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू, कार्तिकीवारीनिमित्त मंदिर समितीचा निर्णय


