पंचधातू पासून बनलेली मूर्ती असणार प्रभू श्रीरामाचं मंदीर; काय आहे आख्यायिका?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
साताऱ्यातील श्री क्षेत्र माहूलीला प्राचीन इतिहास लाभला आहे. याठिकाणी पंचधातू पासून बनलेली मूर्ती आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील श्री क्षेत्र माहूलीला प्राचीन इतिहास लाभला आहे. अनेक प्राचीन मंदिरे गेल्या अनेक शतकापासून माहूलीचा पुरातन इतिहास सांगतात. श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. कृष्णा,वेण्णा या दोन नद्यांचा संगमावर असलेल्या संगम माहूली येथे 27 हून अधिक प्राचीन मंदिरे आहेत. याच प्राचीन मंदिरामध्ये एक प्रभू श्रीरामाचे पुरातन मंदिर आहे. याठिकाणी पंचधातू पासून बनलेली मूर्ती आहे.
advertisement
आहे आहे आख्यायिका?
या ठिकाणी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची अति प्राचीन आणि अतिशय दुर्मिळ, अत्यंत मनमोहक कमळावर उभी असलेली तीन फूट उंची असणारी पंचधातू पासून बनवलेली संपूर्ण भारतामध्ये कोठेही न आढळणारी अतिशय प्राचीन ऐतिहासिक प्रभू श्रीराम यांची मूर्ती आहे, असं दावा येथील गावकरी करतात. छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिराची स्थापना आणि जीर्णोद्धार केलेला आहे. श्री रामदास स्वामी हे कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर स्नानासाठी येत असत. स्नान झाल्यावर ते या प्रभू श्री रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत होते. तिथे जाऊन नतमस्तक होत होते, अशीही या मंदिराबद्दल आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
Pandharpur : श्री राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त सजलं पंढरपूर; फुलांची सुंदर सजावट पाहून मोहित झाले लोक
आत्ताची युवा पिढी या पुरातन मंदिराचे जतन करण्यासाठी पुढे आली आहे. ते प्रभू श्रीरामाच्या मंदिरात अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठांच्या माध्यमातून आज अभिषेक, कीर्तन, तीन हजार दीप प्रज्वलन कार्यक्रम, महाप्रसाद यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन संगम माहुली येथील ग्रामस्थांनी केले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने यांनी दिले आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
January 22, 2024 9:10 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
पंचधातू पासून बनलेली मूर्ती असणार प्रभू श्रीरामाचं मंदीर; काय आहे आख्यायिका?