Shravan Special: दरवर्षी तीळ-तीळ वाढतंय हे शिवलिंग! तीळभांडेश्वर महादेवाच्या मंदिराची अशी आहे अख्यायिका

Last Updated:

shravan shiv puja: येथील शिवलिंगावर 24 तास जलधारा वाहत राहते. विशेष गोष्ट म्हणजे हे शिवलिंग दरवर्षी तिळाच्या आकारात वाढते, असे सांगितले जाते. महादेवाच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या भागातून येथे रोज दर्शनार्थी येतात

शिवलिंग छायाचित्र
शिवलिंग छायाचित्र
मुंबई, 13 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील खंडवा येथे असलेले श्री तीळभांडेश्वर महादेवाचं मंदिर सुमारे 700 वर्षं जुनं आहे. या मंदिरातील शिवलिंग खूप चमत्कारी असल्याचे मानले जाते. येथील शिवलिंगावर 24 तास जलधारा वाहत राहते. विशेष गोष्ट म्हणजे हे शिवलिंग दरवर्षी तिळाच्या आकारात वाढते, असे सांगितले जाते. महादेवाच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या भागातून येथे रोज दर्शनार्थी येतात, मात्र श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा-अर्चा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आपल्या मनोकामना घेऊन येथे पोहोचतात.
मंदिराचा इतिहास आणि धार्मिक श्रद्धेबाबत पंडित भुवनेश्वर भट्ट यांनी सांगितले की, श्री तिळभांडेश्वर महादेव मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. हे शहर अस्तित्वातही नव्हते तेव्हापासून स्वयंप्रकाशित शिवलिंग येथे आहे, मंदिराच्या पुरातनतेचा अंदाज यावरून लावू शकता. शिवलिंगावर 24 तास जल अर्पण केलं जातं. कोणत्याही स्थितीत शिवलिंगावरील जलधार थांबवली जात नाही. बारा महिने चोवीस तास हे शिवलिंग जलधारी जलमग्न असते.
advertisement
पंडितजी पुढे सांगतात की, ही आमची 11वी पिढी महादेवाची सेवा करत आहे. आमचे पूर्वज सांगतात की, देवाधिदेव महादेव जेव्हा येथे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले तेव्हा ते लहान रूपात होते. तेव्हापासून दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी भोलेनाथ पिंढीला तिळाच्या आकारात वाढवत राहतात. महादेवाचा हा चमत्कार त्याच्या येथील भक्तांसाठी विशेष आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Shravan Special: दरवर्षी तीळ-तीळ वाढतंय हे शिवलिंग! तीळभांडेश्वर महादेवाच्या मंदिराची अशी आहे अख्यायिका
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement