संतती प्राप्ती अन् ग्रह दोषातून मुक्ती, सोलापुरातील मंदिरात होते गर्दी, काय आहे आख्यायिका?

Last Updated:

Solapur Temple: सोलापुरातील बाळे येथे प्रसिद्ध मांगोबा मंदिर आहे. देशातील एकमेव केतू मंदिर मानले जात असल्याने या ठिकामी भाविकांची मोठी गर्दी असते.

+
संतती

संतती प्राप्ती अन् ग्रह दोषातून मुक्ती, सोलापुरातील मंदिरात होते गर्दी, काय आहे आख्यायिका?

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर: राहू आणि केतू हे ग्रह मानवी आयुष्यावर परिणाम करणारे मानले जातात. सोलापुरातील बाळे येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी केतूचे प्रसिद्ध मंदिर आहे. आपल्या विविध मागण्या घेऊन भाविक इथं नेहमीच गर्दी करत असतात. या मंदिरात दर्शन घेतल्याने ग्रहदशा बदलते व संकटांचं निराकरण होतं, अशी भक्तांची मान्यता आहे. केतू मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. बाळे येथील मंदिराचे पुजारी अमोल राजीव पाटील यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना माहिती दिलीये.
advertisement
श्री खडेरायांना महादेवाचे रुप मानले जाते, तर केतू ग्रह (मांगोबा) शिवपार्वतीचा अंश मानला जातो. त्यामुळे मांगोबा यांना खंडेरायाचे शिष्य मानले जाते. सोलापुरातील बाळे येथे केतूचे स्वयंभू ठिकाण आहे. अनेक गावातून भाविक आपल्या समस्या, व्यथा घेऊन याठिकाणी येतात. या केतूच्या स्थानाला राहू-केतू स्थान असेही म्हटले जाते. सत्ययुगात समुद्र मंथनामध्ये राहूचे दोन तुकडे झाले. त्यापैकी एक तुकडा येथील वाडी वस्तीला पडले. श्री गणेशाने हे दोन्ही तुकडे एकजागी येऊ नये म्हणून एक तुकडा इथे ठेवल्याचं मानलं जातं. याच ठिकाणी केतू मंदिर असून इथं दर्शन घेतल्यानं राहू-केतूचे दोष कमी होतात, अशी आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
गावाचं नाव बाळे कसं?
केतूनी महादेवाजवळ इच्छा व्यक्त केली होती की, “तुम्ही बाळ अवतार घ्यावे. तेव्हा महादेवांनी सांगितले की, कलयुगामध्ये वाडी वस्ती मध्ये माझा भक्त असेल. तो महादेव अवतारातील खंडोबा देवतेचा एक भक्त सोन्नलगी (सोलापूर) येथे असेल. त्याच्या भक्तीसाठी व तू मागितलेल्या वरदानाची पूर्तता करण्यासाठी तू असशील त्या ठिकाणी येईन. तसेच भक्तांसाठी बाळरुपा त्या गावी येईन. त्यानुसार बाळ रुपात या गावात आले आणि त्यामुळेच गावाचे नाव बाळे झाले. खंडोबा शिव अवतारातील गुरु आणि मांगोबा केतू असल्याने हे गुरु-शिष्याचं नातं असल्याचंही पुजारी सांगतात.
advertisement
दर्शनाने होतो फायदा
राहू ग्रहाचे मंदिर दिल्लीत असल्याचे सांगितले जाते. तर केतू ग्रहाचे मंदिर सोलापुरातील बाळे परिसरात मांगोबा मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. राहू म्हणजे सूर्यग्रहण तर केतू म्हणजे चंद्रग्रहण आहे. सूर्य आत्मबळ वाढवतो आणि चंद्र मनोबल वाढवतो. अशाच या दोन ग्रहांना राहू-केतू ग्रहण लावत असतात. म्हणून याच्या दर्शनाने मात्र भाविकांचे आत्मबल, मनोबल बाढत असते. भारतात वर्षातून एकदा तरी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण येत असते, असंही पुजारी सांगतात.
advertisement
संतान प्राप्तीसाठी दर्शन
ज्योतिषशास्त्री लोकांना गृहदोष, कुळदोष व सर्प दोषातून मुक्त करण्यासाठी मांगोबा मंदिरात दर्शनासाठी पाठवतात. अनेकांना मांगोबांच्या दर्शनाने प्रचिती आली आहे. ज्या तरुण-तरुणींचे लग्न जमत नाही, असे या मंदिरात दर्शनासाठी येतात. अनेकांना त्याचा अनुभव देखील आला असल्याचे सांगितले जाते. संतान प्राप्ती किंवा मूल लवकर बोलत नाहीत, अशांनाही देव दर्शनाने फरक पडला असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले.
advertisement
या दिवशी भाविकांची गर्दी
अनेक भाविक दर्शनासाठी मंगळवारी, शनिवारी व अमावस्येला ग्रहबाधेतून, ग्रहपिढेतून दर्शनाला येतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी केतूचे दर्शन घेण्यासाठी येतात, अशी माहिती मंदिराची पुजारी अमोल पाटील यांनी दिली आहे.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/Temples/
संतती प्राप्ती अन् ग्रह दोषातून मुक्ती, सोलापुरातील मंदिरात होते गर्दी, काय आहे आख्यायिका?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement