Religious: उंबराच्या झाडाचे हे उपाय नशीब पालटतील! सुख-संपत्तीचा कारक शुक्र ग्रहाला करतात प्रबळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Religious Uday: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संबंध झाडे आणि वनस्पतींशीही आहे. ज्याप्रमाणे शनिचा संबंध शमीशी आणि गुरूचा संबंध केळीशी आहे, त्याचप्रमाणे शुक्राचा संबंध उंबराशी आहे.
मुंबई, 01 फेब्रुवारी : सनातन हिंदू धर्मात धातू-रत्नांप्रमाणेच झाडे, वनस्पती यांनाही चमत्कारिक मानले गेले आहे. त्यामुळेच पिंपळ, तुळशी, वड, शमी अशा अनेक झाडांना आणि वनस्पतींना पूजेचे स्थान दिले आहे. ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शुभ फळ मिळविण्यासाठी रत्न किंवा धातू धारण करतात, त्याचप्रमाणे झाडे काही झाडे लावूनही शुभ परिणाम मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संबंध झाडे आणि वनस्पतींशीही आहे. ज्याप्रमाणे शनिचा संबंध शमीशी आणि गुरूचा संबंध केळीशी आहे, त्याचप्रमाणे शुक्राचा संबंध उंबराशी आहे.
कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी, उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नित्यनियमानं उंबराच्या झाडाला पाणी अर्पण केलं किंवा त्याखाली दिवा लावला तर कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो. कारण, शुक्र हा धन आणि सुख-संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे उंबराच्या झाडाशी संबंधित उपाय केल्यानं धन-समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून उंबराच्या उपायांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
उंबराच्या झाडाचे सोपे उपाय तुमचे जीवन आनंदाने भरतील -
उंबराचं झाड लावा: ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा सांगतात की, कुंडलीत शुक्र कमकुवत स्थितीत असेल तर व्यक्तीला भौतिक सुखसोयी आणि पैशांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी शुक्रवारी उंबराचे झाड लावा आणि त्याला रोज पुरेसं पाणी घाला. जसजसा उंबर वाढेल तसतसा शुक्र बलवान होईल. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येऊ लागते.
advertisement
मंत्राचा जप : ज्योतिषांच्या मते, कुंडलीत कमकुवत शुक्र हे गरिबीचे लक्षण मानले जाते. अशा स्थितीत जर एखाद्याचा शुक्र कमजोर असेल तर शुक्रवारी उंबराच्या झाडाच्या लाकडाने हवन करताना 'ओम शम शुक्राय नमः' या मंत्राचा जप करावा. या उपायाने कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते.
advertisement
कामातील अडचणी दूर होतील : ज्योतिषांच्या मते, प्रेमविवाहात अडथळे येत असतील आणि जमीन-संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यासाठी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाची काही छोटी मुळं काढावीत. घरी आणून गंगाजल शिंपडून शुद्ध करा. नंतर तुमच्या मनातील इच्छा ध्यानात ठेवून ते मूळ चांदीच्या ताबीजात घालून परिधान करा.
advertisement
दृष्ट लागू नये म्हणून : तुम्हाला आर्थिक समृद्धी, संपत्तीची प्राप्ती, जमीन किंवा मालमत्तेची खरेदी करण्याची इच्छा असेल, परंतु ते काम पूर्ण करू शकत नसेल तर चांदीच्या ताबीजमध्ये उंबराचे मूळ घालून ते धारण करा. उंबराच्या ताविजाचा हा उपाय परिणामकारक मानला जातो. तसेच ते धारण केल्यानं दृष्ट लागणार नाही.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2024 8:06 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Religious: उंबराच्या झाडाचे हे उपाय नशीब पालटतील! सुख-संपत्तीचा कारक शुक्र ग्रहाला करतात प्रबळ


