अभ्यासात मिळेल उत्तम यश! फक्त रोज या 2 मंत्रांचा करा जप

Last Updated:

tips for students - मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांना चांगले गुण मिळत नसल्याने आई-वडील चिंता करतात. मुलांमध्येही हा तणाव पाहायला मिळतो. विशेषतः मुले जेव्हा कठोर परिश्रम करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाहीत. याचे मुख्य कारण एकाग्रतेचा अभाव असू शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
ईशा बिरोरिया, प्रतिनिधी
ऋषिकेश : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसल्याने तसेच प्रचंड मेहनत करुनही अपेक्षित यश न मिळाल्याने आई-वडील चिंतेत राहतात. मुलेही अभ्यासाच्या दबावामुळे आणि चांगले गुण न मिळाल्याने तणावात राहतात. संपूर्ण प्रयत्न करुनही अडचणी येतात. मात्र, या सर्वांचे मुख्य कारण एकाग्रतेची कमतरता हे असू शकते. अशावेळी विद्यार्थ्यांना दोन मंत्रांचा जप करायला हवा. या मंत्रांचा जप केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष आणि यश मिळण्यास मदत होते. मानसिक शांती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासही याचा फायदा होतो.
advertisement
उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील श्री सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांना चांगले गुण मिळत नसल्याने आई-वडील चिंता करतात. मुलांमध्येही हा तणाव पाहायला मिळतो. विशेषतः मुले जेव्हा कठोर परिश्रम करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाहीत. याचे मुख्य कारण एकाग्रतेचा अभाव असू शकतो.
advertisement
मानसिक शांती आणि एकाग्रता वाढणार -
पुजारी शुभम तिवारी यांनी सांगितले की, चांगले गुण मिळवण्याच्या स्पर्धेत विद्यार्थी मानसिक तणावाचे शिकार बनतात. अशावेळी, काही मंत्रांचा जप केल्याने त्यांची मानसिक शांती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. दोन मंत्रांचा नियमित जप केल्याने अभ्यासात फोकस आणि यश मिळवण्यात यश मिळते, असेही मानले जाते. सरस्वती मंत्र आणि गणेश मंत्र, हे ते दोन मंत्र आहेत.
advertisement
सरस्वती मंत्र आणि गणेश मंत्र
सरस्वती मंत्र - ॐ महासरस्वते नमः
या मंत्राचा जप केल्याने सरस्वती मातेची कृपा होते. सरस्वती माता ज्ञान आणि बुद्धीची देवी मानली जाते. या मंत्राचा जप केल्याने विद्यार्थ्याचे अभ्यासात मन लागते तसेच त्याची स्मरणशक्तीही वाढते.
advertisement
गणेश मंत्र - ॐ गं गणपतये नमः
भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. सर्व समस्या दूर करणारा देव म्हणून गणरायाकडे पाहिले जाते. या मंत्राचा जप केल्याने विद्यार्थ्याची सर्व संकटे दूर होतात आणि अभ्यासात येत असलेले अडथळेही दूर होतात. विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी शांत चित्ताने या दोन मंत्रांचा जप केल्यास त्यांची एकाग्रता सुधारते आणि अभ्यासात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.
advertisement
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
अभ्यासात मिळेल उत्तम यश! फक्त रोज या 2 मंत्रांचा करा जप
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement