Vastu Tips: फायदा नाही तोटाच, घरात असे फोटो-पेंटिग लावणं अशुभ; अराजकता वाढते, आर्थिक नुकसान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips: देवांचे फोटोदेखील योग्य दिशेला लावावेत. भगवान विष्णू, लक्ष्मी, गणेश आणि सरस्वती यांचे फोटो उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावेत. याशिवाय...
मुंबई : घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये घरात लावल्या जाणाऱ्या फोटोंचेही विशेष महत्त्व आहे. वास्तुतज्ज्ञ अंशुल त्रिपाठी यांच्या मते, घरात योग्य फोटो योग्य दिशेला लावल्याने घरात शांती, आनंद आणि यश येते. तर चुकीच्या दिशेला फोटो लावल्यानं मानसिक ताण, आर्थिक समस्या आणि अपयश येऊ शकते.
advertisement
बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो प्रेम वाढवतो, कोणतीही हिंस्त्रता दर्शवणारे फोटो नातेसंबंधात तणाव निर्माण करू शकतात. देवांचे फोटोदेखील योग्य दिशेला लावावेत. भगवान विष्णू, लक्ष्मी, गणेश आणि सरस्वती यांचे फोटो उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावेत. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचे किंवा फळांचे फोटो शुभ मानले जातात. ड्रॉईंग रूममध्ये नैसर्गिक दृश्ये, हसणारी मुले, उगवता सूर्य किंवा वाहते पाणी असलेले फोटो लावावे.
advertisement
उत्तर दिशेला संपत्तीशी संबंधित फोटो जसे की, सोन्याचे नाणे, वाहता झरा किंवा देवी लक्ष्मीचा फोटो लावावा. दक्षिण दिशेला शौर्य आणि धैर्याशी संबंधित फोटो, म्हणजे महाभारत किंवा रामायणातील शक्तिशाली पात्रांचे फोटो लावावेत. घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो लावल्यानं विघ्न दूर होतात.
advertisement
रडणारी बाळे, दुःखी चेहरे, बुडणारी जहाजे, निर्जन ठिकाणे, युद्ध, हिंसक प्राणी, काटेरी किंवा मृत झाडे असलेली फोटो घरात लावू नयेत.
वास्तुशास्त्राचे पालन करून योग्य ठिकाणी योग्य फोटो लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि व्यक्तीला यश, समृद्धी आणि शांती मिळते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2025 7:57 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: फायदा नाही तोटाच, घरात असे फोटो-पेंटिग लावणं अशुभ; अराजकता वाढते, आर्थिक नुकसान