घरात आणि ऑफिसमध्ये ठेवा 'या' पक्ष्याची प्रतिमा; लक्ष्मीमाता होईल प्रसन्न
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
काही वस्तू ठेवणं खूप अशुभ मानलं जातं. घुबडाच्या संदर्भात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, याबद्दल जाणून घेऊ या.
मुंबई : वास्तुशास्त्र म्हणजे असं शास्त्र ज्यात घर कसं बांधावं, कोणत्या दिशेला काय असावं, घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात, कोणत्या ठेवू नयेत, आदी प्रकारची माहिती दिलेली असते. घरात काही वस्तू ठेवणं वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं. तसंच, काही वस्तू ठेवणं खूप अशुभ मानलं जातं. घुबडाच्या संदर्भात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, याबद्दल जाणून घेऊ या.
घुबड या पक्ष्याबद्दल अनेकांना भीती वाटते. काही जण तो अशुभही मानतात. त्याचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवण्याबद्दल अनेकांच्या मनात शंका असते. वास्तविक हिंदू धर्मात घुबड शुभ मानलं गेलं आहे. कारण घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. असं सांगितलं जातं, की घरात घुबडाची मूर्ती किंवा फोटो ठेवला, तर लक्ष्मीमाता प्रसन्न होते. तसंच, तिची कृपा कायम राहते. अर्थात, वास्तुशास्त्रानुसार ते ठेवलं तरच लक्ष्मीची कृपा होणं शक्य आहे. त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये घुबडाची प्रतिमा ठेवण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, याबद्दल जाणून घेऊ या.
advertisement
घरात घुबडाचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची असेल, तर देवघर किंवा स्टडी रूम अर्थात अभ्यासाची खोली ही योग्य ठिकाणं आहेत. या ठिकाणी घुबडाची प्रतिमा लावल्यास घरात सकारात्मकतेचा अनुभव येतो. घरावर कोणाची वाईट नजर असेल, तर ती दूर होईल. घरात सुख-समृद्धी येईल.
घुबडाची प्रतिमा किंवा मूर्ती घरात अशा ठिकाणी ठेवू शकता, जिथून त्याची नजर घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर पडेल. घुबडाची नजर दरवाज्याच्या दिशेला असली, तर ते अधिक शुभ असेल, असं वास्तुशास्त्र सांगतं.
advertisement
ऑफिसमध्येही घुबडाची प्रतिमा ठेवणं शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसमध्ये घुबडाची मूर्ती ठेवल्यास लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसंच, कार्यक्षेत्रात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
ऑफिसमध्ये व्यवसायाशी निगडित वस्तूंच्या जवळ घुबडाची प्रतिमा ठेवली जावी, असं वास्तुशास्त्र सांगतं. काउंटरजवळ ठेवली तरी चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवावी, की ऑफिसमध्ये घुबडाची प्रतिमा ठेवताना आपल्या उजव्या बाजूलाच असेल असं पाहावं. असं केल्यास कामात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगतीही होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2023 4:12 PM IST