सोमवारी हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या कोणत्या वेळेत अधिक सावध राहावं, तज्ज्ञांचा इशारा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे सोमवारच्या दिवशी हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. पण असं का? असा प्रश्न देखील उभा रहातो.
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) ही एक गंभीर समस्या बनली आहे. फक्त वयोवृद्ध नव्हे तर तरुण आणि लहान वयातील लोकही या आजाराचे बळी ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 90 लाख लोक हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यूमुखी पडतात. भारतातही ही परिस्थिती चिंताजनक आहे.
यामध्ये आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे सोमवारच्या दिवशी हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. पण असं का? असा प्रश्न देखील उभा रहातो. मिळालेल्या माहितीनुसार 13 टक्के हार्ट अटॅकचा धोका हा सोमवारच्या दिवशी वाढतो? पण असं का? यामागील प्रमुख कारण म्हणजे आठवड्याच्या शेवटी आराम केल्यानंतर कामाच्या ताणामुळे अचानक वाढणारा स्ट्रेस.
advertisement
थंडीत का वाढतो हृदयविकाराचा धोका?
संशोधनात असेही स्पष्ट झाले आहे की भारतात थंडीत हार्ट अटॅकचा धोका 33% पर्यंत वाढतो. थंड हवामानात रक्तदाब वाढतो, प्रदूषण अधिक असते आणि शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
कोणत्या वेळेत अधिक धोका?
तज्ञांच्या मते, पहाटे 3 ते 6 वाजण्याच्या दरम्यान हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. या वेळी शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढतो, रक्तदाब वाढतो आणि रात्रीच्या झोपेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन रक्त घट्ट होते. त्यामुळे आर्टरीमध्ये थक्के तयार होण्याचा धोका वाढतो.
advertisement
कोणत्या कारणांनी धोका अधिक वाढतो?
अनियमित झोप, उच्च रक्तदाब, मधुमेह, शरीरातील जास्त कोलेस्ट्रॉल यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
थोडीशी सावधगिरी, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास हा मोठा धोका टाळता येऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सोमवारी हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या कोणत्या वेळेत अधिक सावध राहावं, तज्ज्ञांचा इशारा