लग्नात सुपारी, तांदूळ अन् हळदीचा वापर का केला जातो?, जाणून घ्या यामागचं कारण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
marriage remedies - सध्या लगीनसराई सुरू झाली आहे. यामध्ये विविध परंपरा, विधी आपल्याला लग्न समारंभात दिसून येतात. मात्र, लग्नात सात फेरे घेण्याचे काय महत्त्व आहे, फेरे घेताना तांदूळ, हल्दी आणि सुपारी यांचा वापर का केला जातो, याचबाबत आपण जाणून घेणार आहोत.
अहमदाबाद : सध्या लगीनसराई सुरू झाली आहे. यामध्ये विविध परंपरा, विधी आपल्याला लग्न समारंभात दिसून येतात. मात्र, लग्नात सात फेरे घेण्याचे काय महत्त्व आहे, फेरे घेताना तांदूळ, हल्दी आणि सुपारी यांचा वापर का केला जातो, याचबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आंतरराष्ट्रीय ज्योतिषी आणि वास्तु विशेषज्ञ रविभाई जोशी यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, लग्नाच्या सर्व विधींपैकी सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे वधू-वरांनी अग्निदेवतेला साक्षी मानून फेरे घेणे हे आहे. विशेषत: लग्नाच्या आधी वधू-वर एकत्र फेरे घेतात. यामध्ये वधू-वरांचे जीवन नेहमी आनंदाने भरलेले राहावे यासाठी वराची बहीण किंवा कुटुंबातील कोणतीही मुलगी वधू-वरांना एक गाठ बांधतात. ही गाठ बांधताना पैसे, सुपारी, फुले, दुर्वा, तांदूळ, हळद इत्यादींचा वापर केला जातो.
advertisement
यामध्ये प्रत्येक वस्तूचे एक महत्त्व आहे. एक गाठ ही वराच्या कुर्त्याला बांधली जाते तर एक गाठ ही वधूच्या साडीला किंवा पदरला बांधली जाते. हा गाठ वधू-वरांच्या शरीर आणि मनाच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते. तसेच विवाहाच्या बंधनाचे प्रतीक आहे.
सुपारी - सुपारीला एक पवित्र फळ मानले गेले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात सुपारीचा उपयोग होतो. गणेश पुजेत सुपारीला गणेश मूर्तीच्या ठिकाणी पूजले जाते. गणेशाचा आशीर्वाद मिळावा तसेच आयुष्यात येणारी संकटे सुटावीत, यासाठी वर-वधूला सुपारीची गाठ बांधली जाते.
advertisement
तांदूळ - तांदळू हे लग्नानंतर एकत्र खाण्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. तसेच तांदूळ आणि त्याचे विविध पदार्थ भारतात सर्वाधिक खाल्ले जातात, म्हणून तांदूळ हे अन्नाचे प्रतीक मानले जाते.
धन - पैशांचा अर्थ असा की, वधू आणि वर यांना त्यांच्या कोणत्याही उत्पन्नावर, खर्चावर किंवा मालमत्तेवर समान अधिकार असतील. तसेच, दोघांनाही एकमेकांच्या बरोबरीने काम करावे लागेल.
advertisement
हळद - हिंदू धर्मात हळदीला हरिद्रा या नावाने ओळखले जाते. हळद ही गरिबीला दूर करते. हळदीला एक अँटीबायोटिक आणि जंतुनाशक जडी-बूटीही मानले जाते. वधू-वरांच्या जीवनात शारीरिक किंवा मानसिक समस्या असू नयेत आणि गरिबीही दूर राहावी, यासाठी वर-वधुला बांधलेल्या गाठीत हळदीचा वापर केला जातो.
advertisement
फूल - फुले सर्व देवांना आवडतात. फुलांचा सुगंध ज्याप्रमाणे दूरवर पसरतो, त्याचप्रमाणे समाजात वधू-वरांचे जीवन सुगंधित राहावे, यासाठी फुलांचा वापर केला जातो.
दुर्वा - दुर्वा म्हणजे आयुष्यात कधीही आळशी होऊ नका. दुर्वा हे एक गवत आहे जे कोरडे असूनही पाण्याने हिरवे होते. त्याचप्रमाणे वधू-वरांच्या नात्यात सुख-दुःखाचा अनुभव, गोडवा आणि जवळीक सदैव कायम राहावी आणि त्या दोघांमधील त्यांचे प्रेम हे अखंड राहो, यासाठी दुर्वांचा वापर केला जातो.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 24, 2024 4:07 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्नात सुपारी, तांदूळ अन् हळदीचा वापर का केला जातो?, जाणून घ्या यामागचं कारण?


