हिंदू धर्मातील महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? कारण अनेकांना नाही माहित
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या मागचं कारण फारच कमी लोकांना ठावूक असेल. खरंतर अशा अनेक परंपरा चालीरीती वर्षोंनवर्षे चालत आलेल्या आहेत. ज्यांमागची कारणं मात्र अनेकांना माहित नसतात.
मुंबई : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कोणत्याही महिलेला स्मशानभूमीत जाण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे हिंदू महिला कधीही स्मशानभूमीत जात नाहीत. पण असं का? या मागचं कारण फारच कमी लोकांना ठावूक असेल. खरंतर अशा अनेक परंपरा चालीरीती वर्षोंनवर्षे चालत आलेल्या आहेत. ज्यांमागची कारणं मात्र अनेकांना माहित नसतात.
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला आपले मुंडन करावे लागते. हिंदू संस्कृतीत महिलांचे मुंडन करणे शुभ मानले जात नाही, म्हणून त्यांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही.
शिवाय असे म्हटले जाते की, मृतदेह घरातून गेल्यानंतर घर उजाड करू नये, कारण गुरुड पुराणानुसार व्यक्तीचा आत्मा 10 दिवस घरात राहतो. त्यामुळे महिला घरी रहातात.
advertisement
आणखी कारण म्हणजे अंतिम संस्कारानंतर पुरुष आंघोळ करूनच घरात प्रवेश करतात आणि त्याआधी घराची स्वच्छता करण्यासाठी महिलांना घरातच राहावे लागते. असे मानले जाते की स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जा नेहमी पसरते.
शिवाय स्मशानभूमीतील वातावरण पाहाता आणि महिलांचं हळवं मन पाहाता, त्या मनावर ताबा ठेवू शकणार नाहीत, त्या भावनीत होतील. अशा परिस्थितीत वाईट शक्ती त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. यामुळेच महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही.
advertisement
स्मशानभूमीतील वातावरण अशुद्ध आहे, त्यामुळे जंतू महिलांच्या शरीरावर आणि केसांना चिकटून राहतात, त्यामुळे त्यांना आजारांचाही धोका असतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2024 7:40 PM IST


