Science : मानवी शरीरात नेमकी किती छिद्रे असतात? उत्तर वाचून डोकं चक्रावेल; जाणून घ्या विज्ञानाचं रंजक लॉजिक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
How many holes in human body : सामान्य भाषेत आपण वाळूत खोदलेल्या खड्ड्यालाही छिद्र म्हणतो. पण गणित आणि विज्ञानाच्या भाषेत 'छिद्र' म्हणजे केवळ खड्डा नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला गणिताची एक शाखा 'टोपोलॉजी' (Topology) समजून घ्यावी लागेल.
मुंबई : एखाद्याला विचारलं की तुझ्या शरीरात किती छिद्रे आहेत, तर तो तोंड, नाक, कान, डोळे... असं मोजून उत्तर सांगून टाकेल पण गणिततज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मते हे उत्तर चुकीचे असू शकते. टोपोलॉजीच्या सिद्धांतानुसार मानवी शरीरातील छिद्रांची संख्या काहीतरी वेगळीच आहे.
आपण दररोज आरशात पाहतो तेव्हा आपल्याला शरीरावर अनेक इंद्रिये दिसतात. श्वास घेण्यासाठी नाक, पाहण्यासाठी डोळे आणि ऐकण्यासाठी कान. आपण या सगळ्यांना शरीराची 'द्वारे' किंवा छिद्रे मानतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, विज्ञानाच्या नजरेतून एखादे शरीरावरील छिद्र (Hole) नक्की कशाला म्हणतात?
सामान्य भाषेत आपण वाळूत खोदलेल्या खड्ड्यालाही छिद्र म्हणतो. पण गणित आणि विज्ञानाच्या भाषेत 'छिद्र' म्हणजे केवळ खड्डा नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला गणिताची एक शाखा 'टोपोलॉजी' (Topology) समजून घ्यावी लागेल.
advertisement
'छिद्र' म्हणजे नक्की काय? (टोपोलॉजीचे लॉजिक)
टोपोलॉजीनुसार, छिद्र म्हणजे अशी जागा जी आरपार जाते. उदाहरणार्थ, एखादा 'डोनट' (Donut). डोनटमध्ये मध्यभागी एक छिद्र असते, ज्यातून तुम्ही बोट आरपार घालू शकता. तसेच, एखाद्या स्ट्रॉमध्ये (Straw) दोन टोके दिसत असली, तरी गणिती भाषेत त्यात एकच छिद्र असते, कारण एक दोरी एका टोकातून घालून दुसऱ्या टोकातून बाहेर काढता येते.
advertisement
याउलट, कानाचे छिद्र किंवा त्वचेवरील रोमछिद्रे ही विज्ञानाच्या भाषेत 'खरे' छिद्र नाहीत. कारण ती आत गेल्यावर कुठेतरी बंद होतात (जसे कानाचा पडदा). ती शरीराच्या दुसऱ्या भागातून बाहेर पडत नाहीत.
मग शरीरात नक्की किती छिद्रे आहेत?
मानवी शरीराची रचना ही एखाद्या 'जटिल डोनट' सारखी आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या शरीरात मुख्यत्वे 7 किंवा 8 छिद्रे असतात. ती खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
1. तोंड (Mouth): हे पचनसंस्थेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. 2. गुदद्वार (Anus): पचनसंस्थेचे शेवटचे टोक. (तोंड ते गुदद्वार ही एक सलग नळी आहे, त्यामुळे हे एक मुख्य छिद्र मानले जाते). 3. नाकपुड्या (2 Nostrils): नाकाची दोन छिद्रे. 4. अश्रू नलिका (4 Lacrimal Puncta): आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यात वर आणि खाली मिळून चार बारीक छिद्रे असतात, जी अश्रूंना नाकापर्यंत पोहोचवतात.
advertisement
बाहेरून जरी आपल्याला 8 खुली जागा (तोंड + 2 नाकपुड्या + 4 अश्रू नलिका + गुदद्वार) दिसत असल्या, तरी त्या आतून एकमेकांना जोडलेल्या आहेत. जसे अंडरविअरमध्ये कंबर आणि दोन पाय अशी 3 छिद्रे दिसतात अगदी तसच. पण टोपोलॉजीनुसार ती 2 च असतात. तसेच, मानवी शरीरात ही सर्व छिद्रे मिळून 7 'आरपार' छिद्रे तयार होतात.
advertisement
महिलांमध्ये 8 छिद्रे असतात का?
काही तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरात 8 छिद्रे असू शकतात. याचे कारण म्हणजे योनीमार्गातून गर्भाशय आणि तिथून दोन फॅलोपियन ट्यूब्स जोडलेल्या असतात, ज्या ओटीपोटाच्या पोकळीत (Peritoneal Cavity) उघडतात. मात्र, हे पूर्णपणे 'आरपार' नसल्यामुळे अनेक शास्त्रज्ञ याला वेगळे छिद्र मानत नाहीत.
कान आणि इतर छिद्रांचे काय?
कानाचे छिद्र आरपार नसते, ते कानाच्या पडद्यामुळे बंद होते.
advertisement
ही केवळ लहान खड्ड्यांसारखी (Pores) असतात, ती आरपार जात नाहीत.
हा केवळ किडनीपर्यंत जातो, शरीराच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडत नाही.
थोडक्यात सांगायचे तर... आपले शरीर हे एखाद्या 'स्विस चीज' सारखे छिद्रांनी भरलेले नसून, ते एका डोनटसारखे एकमेकांशी जोडलेले आहे. विज्ञानाच्या या नजरेतून पाहिले तर आपण सगळे 7 छिद्रांचे एक अद्भुत यंत्र आहोत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 6:49 PM IST
मराठी बातम्या/science/
Science : मानवी शरीरात नेमकी किती छिद्रे असतात? उत्तर वाचून डोकं चक्रावेल; जाणून घ्या विज्ञानाचं रंजक लॉजिक










