Train : ट्रेन मेटलची असूनही आत बसल्यावर प्रवाशांना Shock का लागत नाही? यामागचं सायन्स 99 टक्के लोकांना माहित नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मग अशात एक प्रश्न उपस्थीत रहातो की संपूर्ण ट्रेन ही मेटलची असते मग आपल्याला ट्रेनमध्ये बसल्यावर शॉक का नाही लागत? यामागे विज्ञानाचे 3 मुख्य चमत्कार दडलेलं आहेत.
मुंबई : तुम्ही हे पाहिलं किंवा ऐकलं असेल की ट्रेनच्या ओवरहेड वायर्स या खूपच धोकादायक असतात, त्याला कोणाचा हात लागला किंवा वस्तूने जरी स्पर्श केला तरी ती गोष्ट जळून खाक होते. त्यात मेटल किंवा धातूच्या वस्तू या वीजेचे गुड कंडक्टर असतात, म्हणजे त्यातून वीज पास होते, पण मग अशात एक प्रश्न उपस्थीत रहातो की संपूर्ण ट्रेन ही मेटलची असते मग आपल्याला ट्रेनमध्ये बसल्यावर शॉक का नाही लागत? यामागे विज्ञानाचे 3 मुख्य चमत्कार दडलेलं आहेत.
1. फॅराडे केज (Faraday Cage) चा नियम
विज्ञानातील हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जेव्हा एखाद्या धातूच्या पोकळ वस्तूवर (जसे की ट्रेनचा डबा) वीज पडते किंवा विद्युतप्रवाह येतो, तेव्हा तो करंट त्या धातूच्या फक्त बाहेरच्या पृष्ठभागावरून (Outer surface) वाहतो. तो धातूच्या आत प्रवेश करू शकत नाही.
ट्रेनचा डबा हा एका बंद खोक्यासारखा असतो. त्यामुळे जरी ओव्हरहेड वायरमधून वीज येत असली, तरी ती डब्याच्या बाहेरील भागातून प्रवाहित होते आणि आत बसलेले प्रवासी पूर्णपणे सुरक्षित राहतात.
advertisement
2. जबरदस्त 'अर्थिंग' (Earthing) व्यवस्था
विजेचा एक साधा नियम आहे. वीज नेहमी जमिनीकडे जाण्याचा सर्वात सोपा रस्ता शोधते. रेल्वेच्या बाबतीत, ओव्हरहेड वायरमधून येणारा करंट इंजिनमधून (पँटोग्राफद्वारे) खाली जातो आणि चाकांमार्फत थेट रेल्वे रुळांमध्ये (Tracks) उतरतो.
हे रेल्वे रूळ ठराविक अंतरावर जमिनीशी घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे वीज डब्यात न थांबता थेट जमिनीत निघून जाते. जर ही अर्थिंग व्यवस्था नसती, तर मात्र ट्रेनला स्पर्श करणे जीवघेणे ठरले असते.
advertisement
3. इन्सुलेशन आणि पँटोग्राफची रचना
ट्रेनच्या छतावर जी कात्रीसारखी रचना दिसते (ज्याला पँटोग्राफ म्हणतात), ती वायरला स्पर्श करते. पँटोग्राफ आणि ट्रेनच्या बॉडीमध्ये हेवी-ड्यूटी इन्सुलेटर्स बसवलेले असतात. हे इन्सुलेटर्स करंटला इंजिनच्या बाहेरील बॉडीमध्ये पसरण्यापासून रोखतात आणि तो वीजप्रवाह थेट इंजिनच्या ट्रान्सफॉर्मरपर्यंत पोहोचवतात.
पण सावधान, 'ही' चूक जीवावर बेतू शकते
जरी ट्रेनच्या आत तुम्ही सुरक्षित असलात, तरी काही गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य आहे.
advertisement
ट्रेनच्या छतावर चढणे, तुम्ही वायरला स्पर्श न करताही, 25,000 व्होल्टची वीज विशिष्ट अंतरावरून तुम्हाला स्वतःकडे खेचू शकते.
ओव्हरहेड वायरच्या खांबांजवळून जाताना किंवा पुलाखाली असताना खिडकीतून लोखंडी सळई किंवा ओल्या वस्तू बाहेर काढणे अत्यंत धोक्याचे असते. थोडक्यात सांगायचे तर, रेल्वेची सुरक्षित रचना आणि 'फॅराडे केज' या विज्ञानाच्या नियमामुळे आपण हजारो व्होल्टच्या विजेच्या खाली असूनही सुखरूप प्रवास करू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 10:06 PM IST
मराठी बातम्या/science/
Train : ट्रेन मेटलची असूनही आत बसल्यावर प्रवाशांना Shock का लागत नाही? यामागचं सायन्स 99 टक्के लोकांना माहित नसेल











