'असं भारतात झालं असतं तर...', 8 तासात 30 विकेट्स! मेलबर्नवरच्या हायव्होल्टेज ड्रामाचे तीन Highlights Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia vs England 4th Test Highlights : मॅचच्या पहिल्या दिवशी 20 विकेट्स पडल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सेशनचा खेळ संपण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग संपली.
Australia vs England Boxing Day Test : मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशेज सीरीजच्या चौथ्या मॅचमध्ये सध्या बॉलर्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये दीड दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच 30 बॅटर्स आऊट झाले असून मैदानावर विकेटांचा अक्षरशः पालापाचोळा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 152 रन केले होते, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांचा पूर्ण संघ केवळ 132 रनवर ऑल आऊट झाला. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 110 रन केले होते आणि आता त्यांना विजयासाठी 175 रनचे टार्गेट मिळाले आहे.
या मॅचच्या पहिल्या दिवशी 20 विकेट्स पडल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सेशनचा खेळ संपण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग संपली. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 46 रन केले, तर कॅप्टन स्टीव्ह स्मिथ 24 रनवर नाबाद राहिला. आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी बोली लागलेल्या कॅमेरून ग्रीनने 19 रनचे योगदान दिले. याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
advertisement
मॅचमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सनी दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केले. कॅप्टन बेन स्टोक्सने 3 तर ब्रायडन कार्सने 4 बॅटर्सना आऊट करून ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला खिंडार पाडले. पहिल्या इनिंगमध्ये जोश टंगने 5 विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या इनिंगमध्ये मायकल नेसरने 35 आणि उस्मान ख्वाजा याने 29 रन केले होते. आता सलग तीन मॅच गमावलेला इंग्लंडचा संघ ही मॅच जिंकून आपली प्रतिष्ठा राखतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
Genius….on and off the park….lose count of how many times Ricky has done this pic.twitter.com/Vh7pfBYklb
— John Bradley (@jbradleymedia) December 26, 2025
The four was wild, the six was unbelievable but the English crowd couldn't get enough of this defence from Ben Duckett. #Ashes pic.twitter.com/S5czIsLgJt
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2025
advertisement
दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरूवात केली असून दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक बॅटिंगचं प्रदर्शन केलं. पण मिचेल स्टार्कने बेन डकेट याला 34 वर आऊट केलं अन् पहिली विकेट पडली. त्यामुळे आता सामना रोमांचक स्थितीत आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'असं भारतात झालं असतं तर...', 8 तासात 30 विकेट्स! मेलबर्नवरच्या हायव्होल्टेज ड्रामाचे तीन Highlights Video










