ना पोलीस संरक्षण, ना ताफा, अजित पवार भल्या पहाटे गेले कुठे? अखेर लोकेशन आलं समोर, राज्यातील मोठी घडामोड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शरद पवार गटासोबत युतीची चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवार अचानक आपला ताफा आणि पोलीस संरक्षण न घेता पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याची माहिती आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत. पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीसाठी अजित पवार राजकीय जुळवाजुळव करताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नसल्याने अजित पवार पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये वेगळी राजकीय आखणी करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून अजित पवार शरद पवार गटाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार गटात गुप्त बैठकांच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत केलं होतं. मात्र ऐनवेळी ही बोलणी फिसकटल्याची चर्चा आहे. घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचवरून दोन्ही गटात बिनसलं असल्याची चर्चा आहे. ही युती फिसकटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांसोबत बोलणी करून महाविकास आघाडीची मोट बांधल्याची माहिती आहे.
advertisement
ही राजकीय उलथापालथ घडल्यानंतर अजित पवार अचानक आपला ताफा आणि पोलीस संरक्षण न घेता पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याची माहिती आहे. आज सकाळी अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये आले होते. मात्र अवघ्या काही मिनिटांत ते पोलीस संरक्षण न घेता तिथून एकटेच निघून गेले. उपमुख्यमंत्री पदावरील एक राजकीय नेता पोलीस सरंक्षण न घेता अशा प्रकारे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
आता अखेर अजित पवारांचं लोकेशन सापडलं आहे. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार ज्या कारने बाहेर पडले होते, ती कार अजित पवारांच्या शिवाजी नगर येथील जिजाई निवासस्थानाबाहेर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अजित पवार देखील इथेच जिजाई निवासस्थानात असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे अजित पवार पोलीस ताफा न घेता जिजाई निवासस्थानी का गेले? इथं ते कुणाला भेटायला आले? अजित पवारांच्या आधीच जिजाई निवासस्थानी कुणी आलंय का? अशा विविध चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
एकीकडे, शरद पवार गटाशी युती फिसकटल्यानंतर आता अजित पवार पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये नक्की काय राजकीय समीकरण बसवतात? कुणाशी युती करतात की एकला चलोचा नारा देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 9:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ना पोलीस संरक्षण, ना ताफा, अजित पवार भल्या पहाटे गेले कुठे? अखेर लोकेशन आलं समोर, राज्यातील मोठी घडामोड











