ट्रेव्हिस हेड Out की Not Out? अ‍ॅशेसमधील सर्वात खराब निर्णय, Video पाहून तुम्हीच सांगा

Last Updated:

Travis Head Out Controversial decision : मेलबर्नवर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ट्रेव्हिस हेडची विकेट सर्वांना चकित करणारी ठरली. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Travis Head Out or not out Controversial decision
Travis Head Out or not out Controversial decision
Australia vs England 4th Test : मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅशेस सिरीजच्या चौथ्या मॅचमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 20 विकेट्स पडल्याने प्रेक्षकही अवाक् झाले होते. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड याच्या विकेटने दुसरा दिवस गाजवला आहे. ट्रेव्हिस हेड याच्या विकेटची चर्चा होताना दिसत आहे. ट्रेव्हिस हेडच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी कांगारूंना मोठा धक्का बसला.

20 व्या ओव्हरवेळी हेडचा कॅच स्लिपला गेला

काल 20 विकेट्स पडल्यानंतर ट्रेव्हिस हेडने सामन्याची सुत्र हातात घेतली. त्याने कांगारूंची एक बाजू लावून धरली. नाईट वॉचमन म्हणून आलेला बोलंड लगेच आऊट झाला. त्यानतंर स्मिथने 24 धावांची खेळी केली पण त्याला मैदानात जास्त वेळ टिकता आलं नाही. त्यानंतर हेडने आक्रमक अंदाजात बॅटिंग सुरू केली. त्यावेळी 20 व्या ओव्हरवेळी हेडचा कॅच स्लिपला गेला.
advertisement

आऊट की नॉट आऊट?

पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रुटच्या हातात बॉल गेल्यावर रुटने पुढे हात सरसावले अन् कॅच टिपला पण त्यावेळी बॉल बाऊन्स झाल्याने आऊट की नॉट आऊट याचा निर्णय अंपायर्सला देणं देखील अवघड झालं होतं. हेडला आऊट दिल्याने ऑस्ट्रेलियाने नाराजी व्यक्त केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
advertisement

पाहा Video

दरम्यान, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा. ट्रेव्हिस हेड आऊट आहे की नॉटआऊट.
advertisement
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, स्कॉट बोलँड.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), विल जॅक्स, गस अ‍ॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ट्रेव्हिस हेड Out की Not Out? अ‍ॅशेसमधील सर्वात खराब निर्णय, Video पाहून तुम्हीच सांगा
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement