रॅली अडवली अन् उमेदवाराला मारल्या चापटी, संभाजीनगरमध्ये MIM च्या दोन गटात तुफान राडा, VIDEO आला समोर

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात एमआयएम (AIMIM) पक्षाच्या दोन गटांमध्ये उमेदवारीच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील किराडपुरा भागात एमआयएम (AIMIM) पक्षाच्या दोन गटांमध्ये उमेदवारीच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नेमकं कारण काय?

संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ च्या उमेदवारीवरून हा वाद उफाळून आला आहे. एमआयएम पक्षाने मोहम्मद इसरार यांना या प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. पक्षाचा हा निर्णय मोहम्मद इसरार यांच्या समर्थकांसाठी आनंदाची बातमी ठरली, तर दुसऱ्या गटासाठी तो संतापाचा विषय बनला. मोहम्मद इसरार यांच्या उमेदवारीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहरात एका भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं.
advertisement

रॅली किराडपुऱ्यात पोहोचताच राडा

मोहम्मद इसरार यांची रॅली वाजतगाजत किराडपुरा परिसरात पोहोचली. याच प्रभागातून हाजी इसाक हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ही रॅली किराडपुरात येताच हाजी इसाक यांच्या समर्थकांनी ती अडवली आणि घोषणाबाजी सुरू केली.
सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची आणि शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही क्षणातच या वादाने हिंसक वळण घेतले. दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि तिथेच तुंबळ हाणामारी सुरू झाली. भररस्त्यात सुरू असलेल्या या राड्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं. यावेळी हाजी इसाक यांच्या कार्यकर्त्यांनी मोहम्मद इसरार यांनाही मारहाण केली. त्यांनी इसरार यांच्या गळ्यातील हार तोडून टाकत ही मारहाण केली. पण यावेळी इसरार यांचे कार्यकर्ते मध्ये पडले आणि घटनास्थळी तुंबळ हाणामारी झाली.
advertisement

परिसरात तणावपूर्ण शांतता

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवली. सध्या किराडपुरा परिसरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. एकाच पक्षाच्या दोन गटांमधील या गटबाजीमुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रॅली अडवली अन् उमेदवाराला मारल्या चापटी, संभाजीनगरमध्ये MIM च्या दोन गटात तुफान राडा, VIDEO आला समोर
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement