advertisement

अफगाणिस्तानमधील 'ही' अभिनेत्री आहे टीम इंडियाची फॅन; सोशल मीडियावर उघडपणे करते भारताचं कौतुक

Last Updated:

अफगाणिस्तानमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, मॉडेल आणि अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. टीम इंडियाला सपोर्ट करते.

wazhma ayoubi
wazhma ayoubi
मुंबई, 08 नोव्हेंबर : सध्या भारतामध्ये सुरू असलेल्या आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. सलग आठ विजय मिळवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते टीम इंडियाचे फॅन झाले आहेत. केवळ भारतीयच नाही तर इतर देशांतील लोकही उघडपणे टीम इंडियाला सपोर्ट करत आहेत. अनेक सिनेस्टार्सही रोहित शर्माच्या टीमला सपोर्ट करत आहेत. अफगाणिस्तानमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, मॉडेल आणि अभिनेत्री वाजमा अयुबीदेखील त्यापैकीच एक आहे.
अफगाणिस्तानमधील अभिनेत्री आणि मॉडेल वाजमा केवळ आपल्या देशाच्या टीमलाच नाही तर भारतालाही सपोर्ट करते. ती अनेकदा टीम इंडियासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. 1995मध्ये अफगाणिस्तानमध्ये वाजमाचा जन्म झाला. सध्या ती दुबईमध्ये राहते. 28 वर्षे वय आणि 5 फूट 9 इंच उंची असलेली वाजमा आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. तिचं वैयक्तीक आयुष्य एखाद्या साहसापेक्षा कमी नाही.
advertisement
वाजमा अयुबी क्रिकेटची मोठी चाहती आहे. भारतीय क्रिकेटर विराट कोहली तिचा आवडता क्रिकेट खेळाडू आहे. याशिवाय, तिला टीम इंडियातील इतरही खेळाडू आवडतात. टीम इंडियाच्या मॅच बघण्यासाठी ती अनेकदा उपस्थित राहते. इतकंच नाही तर टीम इंडियाची जर्सी घालून टीमला चिअरही करते. काही दिवसांपूर्वीच तिनं मोहम्मह शमीच्या बॉलिंगचं कौतुक केलं होतं. शमीसाठी तिनं सोशल मीडियावर पोस्टही केली होती. वाजमा अयुबीनं मोहम्मद शमीसाठी केलेलं हृदयस्पर्शी ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे.
advertisement
29 ऑक्टोबर रोजी लखनौ येथील 'भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम'वर भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट मॅच झाली. त्या मॅचमध्ये शमीनं चमकदार कामगिरी करून चार विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीमुळे अफगाण फॅन गर्ल वाजमा अयुबीला फार आनंद झाला. तिनं एक्सवर (ट्विटर) शमीसाठी एक हृदयस्पर्शी मेसेज पोस्ट केला. "तो मैदानाचा राजा आहे. तो शानदार खेळाडू आहे", असा तो मेसेज होता. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
अफगाणिस्तानमधील 'ही' अभिनेत्री आहे टीम इंडियाची फॅन; सोशल मीडियावर उघडपणे करते भारताचं कौतुक
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement