Amelie Kerr : शाळेत लिहिलेला निबंध 20 वर्षांनंतर खरा ठरला, वर्ल्ड कप जिंकताच गळ्यात पडून ढसाढसा रडली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Amelia Kerr Women T20 World Cup : न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला अन् विजयाची शिल्पकार ठरली एमिलिया केर.. याच एमिलिया केरचं 20 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय.
Who is Amelia Kerr : वुमेन्स टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकचा पराभव करत पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला अन् सुवर्णक्षरात न्यूझीलंडचं नाव वर्ल्ड कप ट्रॉफीवर कोरलं आहे. न्यूझीलंडने 158 धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेला 126 धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने सांघिक खेळीच्या जोरावर सामना जिंकला. न्यूझीलंडच्या विजयात सर्वात महत्त्वाचा वाटा होता एमिलिया केरचा.. एमिलिया केरने 38 चेंडूत 43 धावा केल्या तसेच चार ओव्हरमध्ये 24 धावा देत 3 विकेटही घेतल्या.
काय म्हणाली एमिलिया केर?
एमिलिया केरने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक किस्सा सांगितला. जेव्ही मी शाळेत शिकत होते, तेव्हा मी एक निबंध लिहिला होता. त्यात मी लिहिलं होतं की, मी एक दिवस सोफी डेविन आणि सुझी बेट्ससोबत वर्ल्ड कप जिंकेल. पण आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. आज ते शब्द खरे ठरल्याने मला भावना अनावर झाल्या, असं एमिलिया केरने म्हटलं आहे.
advertisement
मला आज जाणवलेली भावना खरंच खूप खास होती, न्यूझीलंडच्या दोन स्टार खेळाडूंसोबत खेळणं अन् वर्ल्ड कप जिंकणं ही खरंच मोठी भावना आहे, असं एमिलिया केरने म्हटलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात मोठा क्षण आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो, त्यामुळे हा आनंद आमच्यासाठी कधीही न संपणारा आहे. मला नक्कीत गर्व वाटतो की मी या संघाचा भाग आहे, असं एमिलियाने म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान, एमिलिया केर हिने न्यूझीलंडसाठी आतापर्यंत 74 एकदिवसीय सामन्यात 2082 धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात केरच्या नावावर 91 विकेटही जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद 232 हा तिचा सर्वोत्तम स्कोर आहे. तर 85 टी-20 सामन्यात तीने 1296 धावा आणि 93 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये देखील तिने उल्लेखनिय कामगिरी केली. त्यामुळे न्यूझीलंडसाठी ती खरी हिरो ठरली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2024 5:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Amelie Kerr : शाळेत लिहिलेला निबंध 20 वर्षांनंतर खरा ठरला, वर्ल्ड कप जिंकताच गळ्यात पडून ढसाढसा रडली