Arjun Tendulkar : द्रविडच्या धाकट्या मुलाचं प्रमोशन, पण सचिनच्या लेकाचा 'फ्लॉप शो', आयपीएल ऑक्शनआधी हार्दिक पांड्याला टेन्शन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arjun Tendulkar Poor Performance : मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना अर्जुन फक्त एक धाव काढून आऊट झाला. त्याच्याकडे मध्य प्रदेशविरुद्ध मोठी इनिंग खेळण्याची संधी होती. त्यामुळे सध्या अर्जुनच्या कामगिरीची चर्चा आहे.
Arjun Tendulkar Performance in Ranji Trophy : सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचा यंदाच्या सीझनमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स काही खास पहायला मिळाला नाही. या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वाचे योगदानची अपेक्षा अर्जुनकडून होती. परंतू अर्जुनला यंदाच्या रणजी मॅचमध्ये अद्याप चांगली कामगिरी करता आली नाही. मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना अर्जुन फक्त एक धाव काढून आऊट झाला. त्याच्याकडे मध्य प्रदेशविरुद्ध मोठी इनिंग खेळण्याची संधी होती.
अर्जुन तेंडुलकरचा फ्लॉप शो
कर्नाटकविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत चांगला मारा करत 3 विकेट्स घेतल्या. त्याने 29 ओव्हरमध्ये 100 धावा देत निकिन जोस, कृष्णन श्रीजीत आणि अभिनव मनोहर यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. तर पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या डावात अर्जुन तेंडुलकरने फक्त 1 विकेट घेतली. त्याने 17 ओव्हरमध्ये 58 धावा दिल्या.
advertisement
कर्नाटकविरुद्ध संयमी खेळी
कर्नाटकविरुद्धच्या फलंदाजी करताना गोव्याचा संघ अडचणीत असताना अर्जुनने नक्कीच संयमी खेळी केली. 115 चेंडूत 43 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 फोर आणि 1 सिक्स मारला. मात्र, अर्जुनच्या स्ट्राईक रेटवरून अनेक प्रश्न विचारले जात होते. मुंबईमध्ये संधी मिळत नसल्याने गोव्याचा रस्ता पकडलेल्या अर्जुनने गोव्याकडून देखील कामगिरी करून दाखवावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
advertisement
राहुल द्रविडचा धाकट्या मुलाचं प्रमोशन
एकीकडे भारतीय फलंदाज राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड हैदराबादमध्ये बुधवारपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 वनडे चॅलेंजर ट्रॉफीसाठी चार संघांपैकी एकात निवडला गेला आहे. तर दुसरीकडे अर्जुनच्या फ्लॉप शोमुळे क्रिडाविश्वात कुजबूज सुरू असल्याचं कळतंय.
हार्दिक पांड्याला टेन्शन
दरम्यान, स्विंग बॉलर असलेला अर्जुनने आपल्या डोमेस्टिक कारकिर्दीची सुरुवात मुंबईकडून केली, परंतु त्यानंतर 2022 मध्ये अर्जुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळण्याचं ठरवलं. गोव्यासाठीच्या डेब्यू सामन्यातच राजस्थानविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने 120 आणि तीन विकेट्स काढल्या. 2021 च्या लिलावात एमआयमध्ये सामील झाल्यानंतर त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्यामुळे आता हार्दिक पांड्याला टेन्शन आलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : द्रविडच्या धाकट्या मुलाचं प्रमोशन, पण सचिनच्या लेकाचा 'फ्लॉप शो', आयपीएल ऑक्शनआधी हार्दिक पांड्याला टेन्शन!


