टीम इंडियाची नवी डोकेदुखी, IND vs PAK सामन्यात 'गजनी'ची एन्ट्री, 12 खेळाडूंसह खेळणार पाकिस्तान!

Last Updated:

आशिया कप 2025 ला मंगळवार 9 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे.

टीम इंडियाची नवी डोकेदुखी, IND vs PAK सामन्यात 'गजनी'ची एन्ट्री, 12 खेळाडूंसह खेळणार पाकिस्तान!
टीम इंडियाची नवी डोकेदुखी, IND vs PAK सामन्यात 'गजनी'ची एन्ट्री, 12 खेळाडूंसह खेळणार पाकिस्तान!
मुंबई : आशिया कप 2025 ला मंगळवार 9 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे, तर टीम इंडिया पहिला सामना बुधवार 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध खेळणार आहे. आशिया कपच्या एक दिवस आधी आशियाई क्रिकेट काऊन्सिल (ACC) ने स्पर्धेसाठीच्या अंपायरची घोषणा केली आहे. अंपायरच्या नावांची घोषणा होताच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

भारत-पाकिस्तान मॅचसाठी अनलकी अंपायर

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रुचिरा पल्लियागुरुगे याचा एक निर्णय वादात आला होता. 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्या सामन्यादरम्यान केलेल्या अंपायरिंगमुळे पल्लियागुरुगे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मिचेल स्टार्कने टाकलेला बॉल हा नो बॉल असूनही पल्लियागुरुगे यांनी नो बॉल दिला नाही, यानंतर पुढच्याच बॉलला क्रिस गेल आऊट झाला. पल्लियागुरुगे यांनी तो नो बॉल दिला असता तर गेलला पुढचाच बॉल फ्री हिट मिळाला असता, पण दुर्दैवाने अंपायरच्या चुकीमुळे गेलला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. या घटनेनंतर कॉमेंटेटर मायकल होल्डिंग यांनी अंपायरवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. याच सामन्यात पल्लियागुरुगे यांचे आणखी काही निर्णयही वादात सापडले होते.
advertisement

सुपर ओव्हरच विसरला

2016 च्या आशिया कपमध्येही भारत-पाकिस्तान सामन्यात पल्लियागुरुगे यांनी विराट कोहलीला दिलेल्या एलबीडब्ल्यूवरून वाद झाला, ज्याबद्दल विराटने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 2016 सालीच भारत-श्रीलंका यांच्यातील वनडे सामना टाय झाला, पण सुपर ओव्हर खेळवली गेली नाही, त्या सामन्यातही पल्लियागुरुगे अंपायर होते. नियम नीट समजले नसल्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर खेळवली गेली नाही. 2018 च्या निधहासा ट्रॉफीमध्ये श्रीलंका-बांगलादेश यांच्यातल्या सामन्यात पल्लियागुरुगे यांचा नो बॉलचा निर्णय बदलला गेला.
advertisement

आशिया कपसाठी 10 अंपायरची घोषणा

आशिया कप 2025 साठी एसीसीने 10 अंपायरच्या नावांची घोषणा केली आहे. हे अंपायर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे आहेत.
भारत- वीरेंद्र शर्मा, रोहन पंडित
पाकिस्तान- आसिफ याकूब, फैसल आफ्रिदी
बांगलादेश- गाजी सोहेल, मसूदुर रहमान
श्रीलंका- रवींद्र विमलसिरी, रुचिरा पल्लियागुरुगे
अफगाणिस्तान- अहमद पाकतीन, इजातुल्लाह सफी
advertisement

28 डिसेंबरला होणार फायनल

आशिया कप 2025 ची सुरूवात 9 सप्टेंबरपासून होत आहे तर फायनल 28 सप्टेंबरला खेळवली जाणार आहे. यंदाची स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 8 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान आहेत. तर ग्रुप बीमध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. दोन्ही ग्रुपमधल्या 2-2 टीम सुपर-4 मध्ये खेळणार आहेत. तर सुपर-4 मधल्या टॉप 2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाची नवी डोकेदुखी, IND vs PAK सामन्यात 'गजनी'ची एन्ट्री, 12 खेळाडूंसह खेळणार पाकिस्तान!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement