UAE ने हातातली मॅच घालवली, पाकिस्तानला मिळाली Super 4 ची लाईफलाईन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानने युएईचा 41 रननी पराभव केला आहे. याचसोबत ग्रुप ए मधून भारतासह पाकिस्तान सुपर-4 मध्ये पोहोचली आहे.
दुबई : आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानने युएईचा 41 रननी पराभव केला आहे. याचसोबत ग्रुप ए मधून भारतासह पाकिस्तान सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. पाकिस्तानने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना युएईचा 105 रनवरच ऑलआऊट झाला. पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 146/9 वर रोखल्यानंतर युएईच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. तसंच त्यांची सुरूवातही चांगली झाली होती.
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना युएईने 14 व्या ओव्हरमध्ये 85 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण यानंतर युएईची बॅटिंग कोसळली आणि पुढच्या 20 रनमध्येच त्यांनी 7 विकेट गमावल्या. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी, हारिस राऊफ, अबरार अहमद यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर सॅम अयुब आणि सलमान आघाने 1-1 विकेट घेतली. युएईकडून राहुल चोप्राने सर्वाधिक 35 रन केले, तर ध्रुव पराशारने 20 रनची खेळी केली.
advertisement
या सामन्यात युएईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर युएईच्या बॉलरनी पाकिस्तानला 146 रनवर रोखलं. 9व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शाहिन आफ्रिदीने 14 बॉलमध्ये 29 रनची खेळी केली, त्यामुळे पाकिस्तानला एवढ्या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. युएईकडून जुनैद सिद्दीकीने 4 तर सिमरनजीत सिंगने 3 विकेट घेतल्या. याशिवाय ध्रुव पराशारला 1 विकेट मिळाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 12:56 AM IST