Team India : गिलसाठी संजूचा बळी नको; रवी शास्त्रींनी सांगितला Playing XI चा फॉर्म्युला, सूर्या ऐकणार का?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये संजू सॅमसनच्या खेळण्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देतील की नाही? यावर अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मत आहे.
मुंबई : आशिया कपमध्ये संजू सॅमसनच्या खेळण्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देतील की नाही? यावर अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मत आहे. आशिया कपमध्ये शुभमन गिलसाठी संजू सॅमसनची बॅटिंगची जागा बदलू नये, असा सल्ला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय टीमला दिला आहे. गेल्या वर्षी टी-20 मध्ये सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये होता, पण आता गिलच्या पुनरागमनामुळे संजूवरचा दबाव वाढला आहे.
शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अनुपस्थितीत सॅमसन अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला आला होता, असं वक्तव्य आशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा केल्यानंतर, निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी केलं होतं. गिलला आशिया कपसाठी टीम इंडियाचं उपकर्णधार बनवण्यात आले आहे, त्यामुळे अभिषेकसोबत गिल ओपनिंगला येईल हे निश्चित मानलं जात आहे. गिल आणि अभिषेक ओपनिंगला आले तर सॅमसनला खालच्या क्रमांकावर खेळावं लागेल किंवा त्याला टीममधून वगळलं जाण्याचीही शक्यता आहे.
advertisement
गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी टॉप ऑर्डरमध्ये सॅमसनचे स्थान कायम ठेवावे आणि शुभमन गिलला कुठेतरी फिट करावे, असा आग्रह शास्त्री करत आहेत. 'संजू टॉप-3 मध्ये सगळ्यात धोकादायक आहे. तिथेच तो तुम्हाला मॅच जिंकवून देतो. त्याला तिथेच ठेवले पाहिजे. सॅमसनला गिलसाठी बदलणं इतकं सोपं नाही. संजूचं टी-20 च्या टॉप ऑर्डरमधील रेकॉर्ड चांगलं आहे. गिल दुसऱ्या कुणाच्या जागी खेळू शकतो, पण सॅमसनला ओपनर म्हणून खेळवलं पाहिजे. संजूने ओपनर म्हणून बऱ्याच रन आणि शतकं केली आहेत', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 10:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गिलसाठी संजूचा बळी नको; रवी शास्त्रींनी सांगितला Playing XI चा फॉर्म्युला, सूर्या ऐकणार का?