दोन वर्षात सगळं बदललं! आशिया कप जिंकवला त्यांनाच बाहेर केलं, टीम इंडियातून गायब झाले 7 खेळाडू
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
17 सप्टेंबर 2023, याच दिवशी टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 विकेटने पराभव करून आशिया कप 2023 मध्ये विजय मिळवला. आता 2025 च्या आशिया कपला 9 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे.
मुंबई : 17 सप्टेंबर 2023, याच दिवशी टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 विकेटने पराभव करून आशिया कप 2023 मध्ये विजय मिळवला. आता 2025 च्या आशिया कपला 9 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे, पण या 2 वर्षांमध्ये टीम इंडियाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह 7 खेळाडू टीम इंडियामधून गायब झाले आहेत.
2023 च्या आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेची टीम पहिले बॅटिंगला उतरली आणि त्यांचा फक्त 50 रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने फक्त 37 बॉलमध्येच केला आणि ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात एकट्या मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या आणि हार्दिक पांड्याला 3 विकेट मिळाल्या.
2023 आशिया कप फायनलची प्लेयिंग इलेव्हन
advertisement
इशान किशन, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
7 खेळाडू झाले गायब
2025 च्या आशिया कप स्क्वॅडमधून 7 खेळाडू गायब आहेत, जे 2023 आशिया कपच्या फायनलमध्ये खेळले होते. यात विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन मोठी नावं आहेत, ज्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतली आहे. तर मोहम्मद सिराज इंग्लंड दौऱ्यातल्या थकव्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे.
advertisement
इशान किशन नोव्हेंबर 2023 नंतर टीम इंडियाकडून खेळलेला नाही, तर केएल राहुलची टीममध्ये निवड झालेली नाही. वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण त्याचीही आशिया कपसाठी टीम इंडियात निवड झालेली नाही.
टीममध्ये नसलेले 7 खेळाडू
इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज
advertisement
आशिया कप 2025 साठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 8:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दोन वर्षात सगळं बदललं! आशिया कप जिंकवला त्यांनाच बाहेर केलं, टीम इंडियातून गायब झाले 7 खेळाडू