Asia Cup : गिलला दिले क्रिकेटचे धडे, आता बनला त्याचाच दुश्मन... आशिया कपमध्ये टीम इंडियावर करणार वार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप 2025 ला युएईमध्ये सुरूवात झाली आहे. स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना युएईविरुद्ध होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उदयोन्मुख टीममधले बरेच खेळाडू हे भारतीय आहेत.
दुबई : आशिया कप 2025 ला युएईमध्ये सुरूवात झाली आहे. स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना युएईविरुद्ध होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उदयोन्मुख टीममधले बरेच खेळाडू हे भारतीय आहेत. सिमरनजीत सिंग हा त्यातलाच एक. सिमरनजीत सिंग हा आशिया कपमध्ये युएईचा प्रमुख स्पिनर आहे. सिमरनजीत सिंगने लहानपणी शुभमन गिल याला नेटमध्ये बॉलिंग केली होती. मूळचा लुधियानाचा असलेल्या 35 वर्षांच्या सिमरनजीत याने गिलसोबतच्या त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
'मी गिलला तेव्हापासून ओळखतो, जेव्हा तो लहान मुलगा होता, पण तो मला ओळखतो का हे माहिती नाही. 2011-12 साली गिल 11-12 वर्षांचा होता. मोहालीच्या पीसीए अकादमीमध्ये आम्ही सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सराव करायचो. गिल त्याच्या वडिलांसोबत सकाळी 11 वाजता यायचा. मी नेट सेशन संपल्यानंतरही बॉलिंग करायचो, मी गिलसमोर बरीच बॉलिंग केली आहे. त्याला आता आठवत असेल का नाही माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया सिमरनजीत याने दिली आहे.
advertisement
युएईचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनीही सिमरनजीत सिंग याचं कौतुक केलं आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये प्रत्येक डावखुरा बॉलर फ्लाईट द्यायची हिंमत दाखवत नाही, पण सिमरनजीतला फ्लाईट देऊन विकेट कशा मिळतात, हे माहिती आहे, असं लालचंद राजपूत म्हणाले आहेत.
सिमरनजीत सिंग याने आतापर्यंत 12 टी-20 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत. 'मी पंजाबकडून बरीच जिल्हा क्रिकेट खेळलो आहे. 2017 च्या पंजाबच्या संभाव्य रणजी टीममध्येही माझी निवड झाली होती. तसंच मी आयपीएलमध्ये पंजाबच्या नेट्समध्येही बरीच बॉलिंग केली आहे', असं सिमरनजीत म्हणाला आहे.
advertisement
'मला दुबईमध्ये सराव करण्याचा प्रस्ताव मिळाला, यानंतर मी एप्रिल 2021 मध्ये 20 दिवसांसाठी इथे आलो, मग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागला आणि मी बरेच महिने इकडे राहिलो. यामुळे मी युएईमध्ये खेळण्यासाठी पात्र झालो. स्थानिक क्रिकेटमध्ये 3 आणखी सत्र खेळणं गरजेचं होतं, मी ही अट पूर्ण केली,' असं वक्तव्य सिमरनजीत याने केलं आहे.
advertisement
सिमरनजीत दुबईमध्ये 2021 पासून आहे, तसंच तो इथे ज्युनियर खेळाडूंना कोचिंग देत आहे, त्यामुळे त्याची कमाईही चांगली होत आहे. भारताकडून खेळण्याचं माझं स्वप्न होतं, पण मला युएईकडून खेळण्याची संधी मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सिमरनजीत याने दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 11:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : गिलला दिले क्रिकेटचे धडे, आता बनला त्याचाच दुश्मन... आशिया कपमध्ये टीम इंडियावर करणार वार!