IND vs PAK : वैभव-आयुष नेमकं काय बोलले? पाकिस्तानला मिरच्या लागल्या, नक्वीची ICC कडे रडारड!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप अंडर-19 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मैदानात मोठा राडा पाहायला मिळाला.
मुंबई : आशिया कप अंडर-19 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मैदानात मोठा राडा पाहायला मिळाला, यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) भारतीय खेळाडूंविरोधात पीसीबीकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याची योजना आखत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी याबाबत पुष्टी केली आहे.
आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने पहिले बॅटिंग करताना 8 विकेट गमावून 347 रनचा डोंगर उभारला. पाकिस्तानच्या समीर मिन्हासने ऐतिहासिक शतक झळकावले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 26.2 ओव्हरमध्ये फक्त 156 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे पाकिस्तानचा 191 रननी विजय झाला. 13 वर्षांमध्ये पाकिस्तानला पहिल्यांदाच अंडर-19 आशिया कपमध्ये विजय मिळवता आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फायनलवेळी टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी पाकिस्तानचा फास्ट बॉलर अली रझासोबत पंगा घेतला. अली रझाने पहिले आयुष म्हात्रेची विकेट घेतली, त्यानंतर तो आयुषकडे पाहून काहीतरी म्हणाला, त्यानंतर आयुषनेही रझाला त्याच्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं. एवढं सगळं झाल्यानंतरही रझा थांबला नाही, वैभवची विकेट घेतल्यानंतरही त्याने अपशब्द वापरले, तेव्हा वैभवने तू माझ्या पायाची धूळ असल्याचा इशारा रझाकडे बघून केला. भारतीय खेळाडूंच्या या प्रत्युत्तरानंतर पीसीबी नाराज झाली असून आयसीसीकडे तक्रार केली जाणार आहे.
advertisement
आशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या अंडर-19 टीमच्या खेळाडूंचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांच्याकडून सत्कार करण्यात आला. या स्वागत समारंभात माध्यमांशी बोलताना मोहसिन नक्वी म्हणाले की, पाकिस्तान हे प्रकरण आयसीसीकडे नेईल. त्यांनी भारतीय खेळाडूंवर खेळादरम्यान मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला.
'19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना चिथावणी दिली. पाकिस्तान या घटनेची औपचारिक माहिती आयसीसीला देईल. राजकारण आणि खेळ नेहमीच वेगळे ठेवले पाहिजेत', असं नक्वी म्हणाले. सामनादरम्यान, दोन्ही बाजूंच्या खेळाडूंमध्ये अनेक तणावपूर्ण क्षण आणि जोरदार वाद झाले. पाकिस्तानचा मार्गदर्शक सरफराज अहमद याने फायनलदरम्यान भारतीय खेळाडूंच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय खेळाडूंच्या कृती क्रिकेटच्या मूल्यांच्या विरुद्ध होत्या, असा आरोपही सरफराजने केला.
advertisement
'खेळादरम्यान भारताचे वर्तन योग्य नव्हते आणि त्यांचे वर्तन क्रिकेटच्या भावनेविरुद्ध होते. तरीही, आम्ही आमचा विजय क्रीडाभावनेने साजरा केला. क्रिकेट नेहमीच योग्य भावनेने खेळला पाहिजे; भारताने जे केले ते त्यांच्या स्वतःच्या कृती प्रतिबिंबित करते', अशी टीका सरफराजने केली. याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सीनियर टीममध्येही आशिया कपदरम्यान बराच वाद झाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : वैभव-आयुष नेमकं काय बोलले? पाकिस्तानला मिरच्या लागल्या, नक्वीची ICC कडे रडारड!









