IND vs BAN : मुस्तफिजूरचा वाद पेटला, तेव्हाच बांगलादेशने आगीत तेल ओतलं, टीम इंडियाच्या दौऱ्याचं शेड्युल जाहीर केलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यातच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी भारताविरुद्धच्या सीरिजचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
मुंबई : बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यातच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी भारताविरुद्धच्या सीरिजचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सध्या बांगलादेशमधली स्थिती पाहता बीसीसीआय या दौऱ्याला परवानगी देईल का? याबाबत साशंकता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दोन्ही देशांमध्ये तीन वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही सीरिज होणार असल्याचं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.
भारत-बांगलादेश सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 1 सप्टेंबर
दुसरी वनडे- 3 सप्टेंबर
तिसरी वनडे- 6 सप्टेंबर
पहिली टी-20- 9 सप्टेंबर
दुसरी टी-20- 12 सप्टेंबर
तिसरी टी-20- 13 सप्टेंबर
भारताने मागच्या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशचा दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित केला होता. आता दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा झाल्यानंतर या सीरिजची घोषणा करण्यात आल्याचा दावा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला आहे.
advertisement
मुस्तफिजूरला बाहेर करण्याची मागणी
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतात आंदोलन होत आहे. मागच्या 15 दिवसांमध्ये दीपू चंद्र दास सह 4 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना केकेआरने आयपीएल 2026 साठी बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमानला 9 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. शाहरुख खानच्या केकेआरने मुस्तफिजूरला बाहेर करावं, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.
advertisement
मुस्तफिजूरवरून वाद सुरू असतानाच बीसीसीआयने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'हे आमच्या हातात नाही. बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यावर बंदी घाला, असे निर्देश भारत सरकारकडून मिळालेले नाहीत, त्यामुळे यावर भाष्य करता येणार नाही', असं बीसीसीआयच्या सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितलं. दरम्यान पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशची टीम भारतात येणार आहे, पण बांगलादेशच्या टीमला भारतात खेळण्याची परवानगी मिळणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 7:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : मुस्तफिजूरचा वाद पेटला, तेव्हाच बांगलादेशने आगीत तेल ओतलं, टीम इंडियाच्या दौऱ्याचं शेड्युल जाहीर केलं!










