BCCI मध्ये नोकरीची संधी, 90 लाख रुपयांचं पॅकेज, कोण करू शकणार अप्लाय?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने नोकरीसाठी जाहिरात दिली आहे, यामध्ये निवड समिती सदस्यांच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
मुंबई : जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने नोकरीसाठी जाहिरात दिली आहे, यामध्ये निवड समिती सदस्यांच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. याशिवाय महिला आणि ज्युनियर सिलेक्शन कमिटीची पदंही भरण्यात येणार आहे. या पदांसाठी बीसीसीआयने काही अटीही ठेवल्या आहेत. याशिवाय निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आला आहे. निवड समिती सदस्य झालेल्यांना बीसीसीआय वर्षाला 90 लाख रुपये देणार आहे.
या पदांसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज
बीसीसीआयने शुक्रवार 22 ऑगस्टला वेबसाईटवर वेगवेगळ्या पदांसाठी जाहिराती दिल्या आहेत. यामध्ये सीनियर मेन्स टीमसाठी 2 सिलेक्टर, महिला टीमसाठी 4 सिलेक्टर, ज्युनियर टीमसाठी 1 सिलेक्टरच्या निवडीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी बीसीसीआयने अटीही जाहीर केल्या आहेत. सीनियर मेन्स टीमच्या निवड समितीचा सदस्य होण्यासाठी टीम इंडियाकडून 7 टेस्ट किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळणं गरजेचं आहे. यापैकी कोणतीही अट पूर्ण करणारा खेळाडू या पदासाठी अर्ज करू शकतो.
advertisement
NEWS - BCCI invites applications for positions on its Senior Men’s, Women’s, and Junior Men’s Selection Committees.
More details here - https://t.co/VwyzZNsU9t pic.twitter.com/is3xfvs53c
— BCCI (@BCCI) August 22, 2025
याशिवाय महिला सिलेक्शन कमिटीसाठी 4 महिला सदस्यांचा अर्जही मागवण्यात आला आहे. या पदासाठी 5 वर्षांपूर्वी टीम इंडियातून रिटायरमेंट घेतलेली महिला क्रिकेटपटू अर्ज करू शकते. तसंच अर्ज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूने मागच्या 5 वर्षात कोणत्याही क्रिकेट कमिटीचं सदस्य असता कामा नये.
advertisement
सीनियर टीमच्या सिलेक्शन कमिटीच्या सदस्याला जवळपास 90 लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत. याशिवाय ज्युनियर क्रिकेट समिती सदस्याला 30 लाख रुपये बीसीसीआय वर्षाला देणार आहेत. ज्युनियर क्रिकेटच्या सिलेक्शन कमिटीच्या एका सदस्यासाठी अर्ज मागवण्यात आला आहे. यासाठी कमीत कमी 25 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव गरजेचा आहे. तसंच खेळाडूने मागच्या 5 वर्षात कोणत्याही क्रिकेट कमिटीचं सदस्य नसावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. यानंतर स्क्रीनिंग तसंच शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया केली जाईल आणि मग मुलाखतीला बोलावलं जाईल. मुलाखती झाल्यानंतर निवड समितीच्या सदस्यांची घोषणा केली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 7:13 PM IST