Asia Cup 2025 : अल्टिमेटम दिला तरीही ऐकलं नाही, आता मोहसिन नक्वी कर्माची फळं भोगणार! 4 नोव्हेंबरला BCCI उचलणार मोठं पाऊल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI Secretary On Asia Cup 2025 trophy : मोहसिन नक्वी यांनी आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Asia Cup 2025 Trophy Row : आशिया कप 2025 स्पर्धा जिंकूनही विजेतेपदाची ट्रॉफी न मिळाल्याच्या वादावर बीसीसीआय ठाम आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी नुकतेच एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्टपणे नकार दिला आहे. अशातच आता मोहसिन नक्वी यांनी आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आशियाई क्रिकेट असोशिएशनला पत्र
देवजित सैकिया यांनी सांगितलं की, "आम्ही दहा दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट असोशिएशनला पत्र पाठवलं होतं, पण त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही याच भूमिकेवर ठाम आहोत." भारत ही स्पर्धा जिंकल्याने ट्रॉफी निश्चितपणे येईल, परंतु ती मोहसीन नकवी यांच्या हातून स्वीकारणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
advertisement
On the Asia Cup 2025 trophy row, BCCI Secretary Devajit Saikia told ANI, "We have approached ACC (Asian Cricket Council) and we have sent a letter 10 days ago. There is no positive response. We are maintaining the same stand. So, we are going to raise the issue in the ICC meeting… pic.twitter.com/ZMybpuHFZ6
— ANI (@ANI) November 1, 2025
advertisement
ट्रॉफी स्वीकारायची असती, तर...
"जर आम्हाला त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची असती, तर आम्ही ती फायनलच्या दिवशीच घेतली असती. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की, आम्ही त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही," असं देवजित सैकिया म्हणाले आहेत.
टाइमलाइन निश्चित केली
दरम्यान, 4 नोव्हेंबरपासून दुबईत सुरू होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि ट्रॉफी भारतात आणण्यासाठी योग्य टाइमलाइन निश्चित केली जाईल, असंही देवजित यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : अल्टिमेटम दिला तरीही ऐकलं नाही, आता मोहसिन नक्वी कर्माची फळं भोगणार! 4 नोव्हेंबरला BCCI उचलणार मोठं पाऊल


