IPL 2026 : एकीकडे टीम विकायला काढली अन् दुसरीकडे…, 2026 च्या आयपीएलपूर्वी RCB च्या संघात मोठा बदल!

Last Updated:

ध्या एका बातमी चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे आरसीबी विकली जाणार का? हो, आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकणारी आरसीबी विक्रीला काढण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून आरसीबीचे मालक टीम विकण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त होतं, अखेर या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

News18
News18
IPL 2026, RCB : सध्या एका बातमी चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे आरसीबी विकली जाणार का? हो, आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकणारी आरसीबी विक्रीला काढण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून आरसीबीचे मालक टीम विकण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त होतं, अखेर या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. आरसीबीचे मालक टीमची विक्री करणार असल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. टीम विक्रीची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून 31 मार्च 2026 पर्यंत टीमची विक्री होईल, असा विश्वास मालकांनी व्यक्त केला आहे.
विक्रीपूर्वीच बदलला हेड कोच
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रीपूर्वीच आरसीबीचा हेड कोच बदलण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 36 वर्षीय माजी भारतीय फिरकी गोलंदाज मलोलन रंगराजन यांची महिला प्रीमियर लीग 2026 साठी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते ल्यूक विल्यम्सची जागा घेतील, जे 2024 पासून या पदावर होते. विल्यम्स बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्यस्त असतील, ज्याचा आगामी हंगाम जानेवारीच्या सुरुवातीला सुरू होईल. तामिळनाडूचा माजी खेळाडू मालोलन गेल्या सहा वर्षांपासून विविध पदांवर फ्रँचायझीसोबत आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
advertisement
रंगराजन कोण आहे?
चेन्नईचा रंगराजन हा स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करतो. 2011 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रंगराजनने 2019 पर्यंत 47 प्रथम श्रेणी सामने, 10 लिस्ट ए सामने आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्याकडे 136 विकेट्स आणि 1379 धावा आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्याकडे 10 विकेट्स आणि 123 धावा आहेत.
advertisement
चार खेळाडू कायम
महिला प्रीमियर लीग 2026 साठी मेगा लिलाव 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याआधी, सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन लिस्ट जाहीर केल्या आहेत. बेंगळुरूने चार खेळाडूंना रिटेन केले आहे. स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष आणि श्रेयंका पाटील. तथापि, ते लिलावादरम्यान सोफी डेव्हिन किंवा रेणुका सिंग यांना खरेदी करण्यासाठी राईट-टू-मॅच (RTM) पर्याय वापरू शकतात.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : एकीकडे टीम विकायला काढली अन् दुसरीकडे…, 2026 च्या आयपीएलपूर्वी RCB च्या संघात मोठा बदल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement