Amol Muzumdar : स्मृती, जेमिमा, राधाला 2.25 कोटी रुपये, अमोल मुझुमदारला CM फडणवीसांनी कितीचा चेक दिला?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय महिला क्रिकेट टीमने वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडू आणि कोच अमोल मुझुमदार यांचा सत्कार केला.
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमने वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरता आलं आहे. रविवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बुधवारी भारताची महिला टीम, प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मिन्हास यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारतीय महिला टीमच्या कामगिरीचं कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा या निवासस्थानी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही खेळाडूंचा सत्कार करून तिघींना प्रत्येकी 2.25 कोटी रुपये बक्षीस दिलं. याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचाही सत्कार करून त्यांना 22.50 लाख रुपयांचे चेक देऊन त्यांचा गौरव केला.
advertisement
सपोर्ट स्टाफचाही सन्मान
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचाही सन्मान करून त्यांना 11 लाख रुपये देण्याची घोषणा केली. बॉलिंग प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडुलजी, ऍनलिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा, गंभीरराव, मिहीर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिररुल्ला या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये होत्या. हे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ महाराष्ट्राचे आहेत.
advertisement
फडणवीसांकडून टीमचं कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं कौतुक केलं. टीमच्या ऐतिहासिक विजयामुळे फक्त देशाचाच नाही तर महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढला आहे. खेळाडूंना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रातल्या इतर खेळाडूंनाही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
'तुम्ही डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तुमची स्टोरी आम्ही सगळ्यांनी पाहिली आहे, त्यामुळे तुमच्यावर लवकरच सिनेमा येईल', असं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल मुझुमदार यांच्याकडे पाहून केलं. टीम इंडियाच्या खेळाडू, कोच आणि सपोर्ट स्टाफचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अधिकारी उपस्थित होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Amol Muzumdar : स्मृती, जेमिमा, राधाला 2.25 कोटी रुपये, अमोल मुझुमदारला CM फडणवीसांनी कितीचा चेक दिला?


