'सिलेक्शन कमिटीची बैठक LIVE दाखवा', नेमकं राजकारण कुठं होतंय? गंभीरच्या माजी सहकाऱ्याचा खळबळजनक आरोप!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Manoj Tiwari On Selection Meeting : गंभीरचा एकेकाळचा खास सहकारी आणि क्रिकेटर मनोज तिवारीच्या मते, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल हे दोन्ही खेळाडू आशिया कपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र होते.
Asia Cup Selection Controversy : पंजाब किंग्जचा स्टार कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas iyer) याला आशिया कपच्या स्कॉडमध्ये संधी न मिळाल्याने अनेकांनी सिलेक्शन कमिटीवर टीकेची झोड उठवली होती. अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निवड समितीची बैठक थेट प्रक्षेपित करावी, अशी मागणी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचा पूर्वीचा संघ सहकारी मनोज तिवारीने केली आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या भावनांचा आदर करत निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हे आवश्यक आहे, असे मनोज तिवारीचं म्हणलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना संघातून वगळल्यामुळे तिवारीने (Manoj Tiwari) आपली नाराजी व्यक्त केली आहे.
श्रेयस अय्यर का घेतलं नाही? - मनोज तिवारी
मनोज तिवारीच्या मते, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल हे दोन्ही खेळाडू आशिया कपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र होते. एकीकडे, शुभमन गिलला टी-20 मध्ये परत आणण्यासाठी उपकर्णधारपद दिलं गेलं, तर दुसरीकडे अय्यरला संघातून पूर्णपणे वगळलं गेलं. या निर्णयामुळे मोठा वाद सुरू झाला आणि गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. माजी राष्ट्रीय मुख्य निवडकर्ते क्रिस श्रीकांत यांच्यासह अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी यशस्वी आणि श्रेयस यांना दुर्लक्षित केल्याबद्दल निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.
advertisement
निवड समितीची बैठक थेट प्रक्षेपित करा
आपली नाराजी व्यक्त करताना तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, “जे खेळाडू संधी मिळवण्यासाठी पात्र आहेत, त्यांना संधी मिळत नाहीये. त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे की, निवड समितीची बैठक थेट प्रक्षेपित केली पाहिजे, जेणेकरून क्रिकेटप्रेमींना हे कळेल की कोणत्या खेळाडूला का निवडले गेले आणि दुसऱ्याला का नाही? फक्त पत्रकार परिषदेत येऊन एखाद्या खेळाडूला वगळण्याबद्दल एक-दोन गोष्टी सांगणे आणि नंतर काही वेगळेच करणं योग्य नाहीये.”
advertisement
गंभीरवर खोचक टीका
तिवारी पुढे म्हणाले, “दोन योग्य खेळाडू, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जायसवाल, टीममधून बाहेर आहेत. तुम्ही गौतम गंभीर यांच्या जुन्या मुलाखती पाहिल्या, तर त्यांनी म्हटले होते की यशस्वी जयस्वाल असा खेळाडू आहे, ज्याला टी-20 क्रिकेटमधून बाहेर ठेवले जाऊ शकत नाही. आता जेव्हा गंभीर स्वतः कोच आहेत, तेव्हाही यशस्वीसाठी संघात जागा नाहीये.”
advertisement
दरम्यान, श्रेयस अय्यरला संघात न घेतल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोप उठवली जात असताना आता मनोज तिवारीने देखील आपलं मत मांडलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'सिलेक्शन कमिटीची बैठक LIVE दाखवा', नेमकं राजकारण कुठं होतंय? गंभीरच्या माजी सहकाऱ्याचा खळबळजनक आरोप!