advertisement

Weather Alert: वारं फिरलं, मराठवाड्यातून पावसाची माघार, 9 सप्टेंबरचा हवामान अंदाज

Last Updated:
1/5
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज 9 सप्टेंबर रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
आज 9 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा कुठलाही अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या पाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

3/5
जालना, बीड आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून पावसासोबत दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे तापमानात थोडी घट जाणवेल. वाऱ्याचा वेग कमी-जास्त होत राहणार असल्यामुळे हवा खेळती राहील.

4/5
हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे पाऊस ओसरला आहे. हवामानात काही बदल होत असल्याने पावसाचा जोर कमी झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. हवामानाच्या बदलामुळे नागरिक आजारी पडू लागले असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचे चित्र आहे.

5/5
मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा कुठलाही अलर्ट आज हवामान विभागाने दिला नाही. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांची कामे करण्यास सोपे होणार आहे. येणाऱ्या 48 तासांत ढगाळ आणि दमट वातावरण राहून रिमझिम पाऊस होऊ शकतो. पुढील काही काळ हीच स्थिती कायम राहणार असल्याचे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement