VIDEO : होल्डरने बॉल टाकला पण बॅटर काय विकेटकीपरपर्यंतही पोहोचला नाही, असा No Ball कधी पाहिलाच नसेल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
DC vs ADKR Jason Holder No ball : दुबई कॅपिटल्स आणि अबू धाबी नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू जेसन होल्डर याने महत्त्वाची ओव्हर टाकली.
Jason Holder No ball delivery : डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीगमध्ये सध्या क्रिकेटचा थरार पाहायला मिळत असून, दुबई कॅपिटल्स (DC) आणि अबू धाबी नाईट रायडर्स (ADKR) यांच्यात झालेली मॅच अत्यंत चुरशीची ठरली. या दोन्ही बलाढ्य संघांमधील लढतीत अखेरच्या ओव्हरपर्यंत उत्कंठा कायम होती. अखेरच्या काही बॉल्सवर विजय मिळवण्यासाठी अबू धाबीला मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु दुबईच्या फास्ट बॉलर्सनी यॉर्करचा प्रभावी वापर करत धावसंख्या रोखून धरली. या अटीतटीच्या लढतीत दुबई कॅपिटल्सने मॅच जिंकून 2 गुण आपल्या नावावर केले. परंतू या सामन्यात एक महत्त्वाची घटना घडली.
होल्डरचा बॉलवर होल्ड राहिला नाही अन्
दुबई कॅपिटल्स (DC) आणि अबू धाबी नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू जेसन होल्डर याने महत्त्वाची ओव्हर टाकली. यावेळी होल्डरने चतुराईने फिल्डिंग लावली होती. स्लिपला आंद्रे रसलला उभं केलं होतं. मात्र, होल्डरचा बॉलवर होल्ड राहिला नाही अन् बॉल भलत्याच दिशेला गेला. बॉलने थेट पॉइंटच्या दिशेने झेप घेतली अन् बॅटरसह विकेटकीपर देखील चकित झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
पाहा Video
"TV Umpire to Director, can we check the height on this one for a No Ball?"
Keep those towels handy, Knights. 🧻#DCvADKR #DPWorldILT20 #WhereTheWorldPlays #AllInForCricket pic.twitter.com/Mi43Apq7hB
— International League T20 (@ILT20Official) January 1, 2026
advertisement
डेथ ओव्हर्समध्ये धुवांधार बॅटिंग
या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना दुबई कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली. त्यांच्या सलामीच्या बॅट्समननी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत धावसंख्या वेगाने वाढवली. मधल्या फळीतील फलंदाजांनीही फटकेबाजी करत आपल्या टीमला 200 रन्सच्या जवळ पोहोचवले. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये झालेल्या धुवांधार बॅटिंगमुळे दुबईने अबू धाबीसमोर मोठे आव्हान ठेवले होते.
advertisement
अचूक टप्प्यावर बॉलिंग
प्रत्युत्तरादाखल खेळताना अबू धाबी नाईट रायडर्सची सुरुवात काहीशी खराब झाली. त्यांचे महत्त्वाचे 3 बॅट्समन लवकर बाद झाल्याने टीम अडचणीत आली होती. मात्र, मधल्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेल आणि इतर खेळाडूंनी काही मोठे सिक्स मारून मॅचमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. दुबईच्या बॉलर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत रनरेट नियंत्रण ठेवलं आणि ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 10:11 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : होल्डरने बॉल टाकला पण बॅटर काय विकेटकीपरपर्यंतही पोहोचला नाही, असा No Ball कधी पाहिलाच नसेल!










