Divya Deshmukh : चेस वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा Video कॉल, थेट मराठीतून संवाद

Last Updated:

नागपूरच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे लोकसभा खासदार नितीन गडकरी यांनी दिव्याला व्हिडिओ कॉल करून तिच्या या यशाबद्दल तिचं अभिनंदन केलं.

चेस वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा Video कॉल, थेट मराठीतून संवाद
चेस वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा Video कॉल, थेट मराठीतून संवाद
नागपूर : नागपूरच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे लोकसभा खासदार नितीन गडकरी यांनी दिव्याला व्हिडिओ कॉल करून तिच्या या यशाबद्दल तिचं अभिनंदन केलं. नितीन गडकरी यांनी दिव्या देशमुखला फोन करून तिच्यासोबत मराठीतून संवाद साधला.
नागपूरच्या मुलीला विश्वविजेतेपद मिळाल्याचा आनंद नितीन गडकरींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नितीन गडकरींनी मराठीमध्ये दिव्याचं अभिनंदन केलं. दिव्याने अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीचा पराभव केला. 19 वर्षीय दिव्याच्या यशाचा आनंद संपूर्ण देश साजरा करत आहे. दिव्या बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नागपुरात दिव्याच्या विजयानंतर आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
advertisement
advertisement

काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरी यांनी दिव्याला तिच्या यशाबद्दल शुभेच्छा देऊन प्रोत्साहन दिले. नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉलमध्ये हसत हसत तिचे अभिनंदन केले.
व्हिडिओ कॉलवर दिव्या देशमुखचे अभिनंदन केल्यानंतर, नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'हा क्षण केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रचंड अभिमान आणि आनंदाचा क्षण आहे. दिव्या आणखी उंची गाठत राहावी अशी माझी इच्छा आहे, कारण तिची ही उल्लेखनीय कामगिरी तरुणांसाठी खरी प्रेरणा आहे.'
advertisement
advertisement
नितीन गडकरी यांनी दिव्या देशमुख बुद्धिबळाची विश्वविजेती बनली तेव्हाचा क्षणही शेअर केला आहे. हा विश्वचषक जॉर्जियामध्ये खेळला गेला होता. भारतात परतल्यावर मुंबईसह नागपूरमध्ये दिव्या देशमुखचं स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Divya Deshmukh : चेस वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा Video कॉल, थेट मराठीतून संवाद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement