स्पॉन्सरशिवाय टीम इंडिया आशिया कप खेळणार? Dream11 चा ‘खेळ खल्लास’, कुणाला लागणार लॉटरी?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Indian Cricket Team sponsor : ड्रीम 11 ही कंपनी भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर म्हणून करार पुढे चालू ठेवण्यास इच्छुक नाही, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
Indian Cricket team New Sponsor : आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मोठा धक्का बसला आहे. भारताच्या संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या 'ऑनलाइन गेमिंग नियमन विधेयक 2025' मुळे, फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम 11 ने आपले पैसे संबंधित सर्व गेम्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, टीम इंडिया आणि बीसीसीआय यांच्यातील 358 कोटी रुपयांचा करार धोक्यात आला आहे.
भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर
ड्रीम 11 ही कंपनी भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर म्हणून करार पुढे चालू ठेवण्यास इच्छुक नाही, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यामुळे, आगामी आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर ड्रीम 11 चा लोगो दिसणार नाही, अशी शक्यता आहे.
देवजीत सैकिया म्हणाले...
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही देशाच्या कायद्यांचा पूर्णपणे आदर करतो आणि सरकारचे सर्व नियम पाळण्यास आम्ही कटिबद्ध आहोत," असे त्यांनी म्हटले आहे. 2023 मध्ये झालेला हा करार प्रत्येक घरच्या सामन्यासाठी 3 कोटी आणि परदेशी सामन्यासाठी 1 कोटी रुपयांचा होता. परंतु, नवीन कायद्यांमुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
नवीन जर्सी स्पॉन्सर
या अनपेक्षित घडामोडींमुळे बीसीसीआयला आता नवीन जर्सी स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. जर आशिया कप सुरू होण्यापूर्वी नवीन स्पॉन्सर मिळाला नाही, तर टीम इंडियाला एका मोठ्या स्पर्धेत लोगोशिवायच खेळावे लागू शकते. हा बीसीसीआयसाठी केवळ आर्थिकच नव्हे, तर ब्रँडिंगच्या दृष्टीनेही एक मोठा प्रश्न आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्पॉन्सरशिवाय टीम इंडिया आशिया कप खेळणार? Dream11 चा ‘खेळ खल्लास’, कुणाला लागणार लॉटरी?